ED Summons to Sanjay Pande : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ED कडून समन्स
Sanjay Pandey (PC - Twitter)

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या निवृत्तीनंतर अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संजय पांडे यांना ED कडून समन्स बजावण्यात आलं असुन त्यांना 5 जुलैला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलेलं नाही. परंतु ते मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात होते.

 संजय पांडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले असुन त्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर (Vivek Falsankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई  पोलीस आयुक्त पद आता अत्यंत चर्चीत पद झालं आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी आणि अन्य आरोपांखाली गुन्हे दाखल झाले होते परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. आता त्या पाठोपाठ संजय पांडे यांना ED चे समन्स येणं ही बाब मुंबई पोलीस आयुक्त पदावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. ( हेही वाचा :- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 3500 एपिसोड पूर्ण, टीम कडून अनोख्या पध्दतीने सिलीब्रेशन)

 5 जुलैला ईडी  चौकशीनंतरच संजय पांडे यांनी समन्स बजावण्यामागचं कारण पुढे येईल तरी दोन दिवसांनंतर संजय पांडे ईडी  चौकशीसाठी उपस्थित असतील का याकडे सर्वाचं लक्ष लागल आहे.