Dynamite Blast in Karnataka: शिवगोमा येथील रेल्वे क्रशर साईटवर झालेल्या भीषण स्फोटात 8 जणांना मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख
Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

कर्नाटकातील (Karnataka) शिवमोगा (Shivamogga) येथे खडी क्रशर साईटवर काल (गुरुवार, 21 जानेवारी) रात्री 10.30 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटाचा हादरा केवळ शिवगोमा येथेच नाही तर शेजारील चिक्कामागलुरू (Chikkamagaluru) आणि दावणगेरे (Davangere) जिल्ह्यातही जाणवला. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांना मृत्यू झाला आहे. अशी माहिती शिवमोगा जिल्हाधिकारी के.बी. शिवकुमार (Shivamogga District Collector KB Shivakuma) यांनी दिली आहे. ट्रक मधून डायनामाइटची वाहतूक करत असताना हा भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या तर रस्ते, घरे यांना भेगा पडल्या.

ही दुर्घटना शिवगोमा-हनागल राज्य हायवेवरील अबलागरे गावात घडली. जे सावळुंगा व शिकारीपुरा मार्गावरुन जाते. या स्फोटात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून स्फोटात होरपळलेल्यांची मृतदेहांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्यांची ओळखही पटत नाही.

ANI Tweet:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवमोगा येथील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसंच त्यांच्या कुटुंबियांचे देखील सांत्वन केले आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना कर आहे. पीडितांना राज्य सरकारकडून शक्य तितकी सर्व मदत करण्यात येईल, असे म्हणत त्यांनी सर्वांना आश्वस्तही केले आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की भुकंप झाल्यासारखे अनेकांना भासले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी घराबाहेर धाव घेतली.