Air India Express Flight (PC -Wikimedia Commons)

Drunk Passenger Misbehaves With Woman Crew Member: दुबई-जयपूर एअर इंडिया एक्सप्रेस विमानात (Dubai-Jaipur Air India Express Flight) शनिवारी एका मद्यधुंद प्रवाशाचे महिला क्रू मेंबरशी गैरवर्तन (Drunk Passenger Misbehaves With Woman Crew Member) केल्याचा प्रकार समोर आला आहे. विमान राजस्थानच्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर, क्रूच्या तक्रारीनंतर एअरलाइनने विमानतळ प्राधिकरणाला याबाबत माहिती दिली. एअरलाइनने याप्रकरणी औपचारिक तक्रार दाखल केली. तथापी, अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने आरोपी प्रवाशाची ओळख किंवा कथित गैरवर्तनाचे नेमके स्वरूप याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती जाहीर केलेली नाही.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत अमृतसरहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका उद्धट प्रवाशाच्या वर्तनाची घटना घडली, ज्यामुळे केबिन क्रू आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केली. 28 जून रोजी विमान लँडिंगची तयारी करत असताना AI454 या विमानात ही घटना घडली. एअर इंडियाच्या अधिकृत निवेदनानुसार, विमान उतरत असताना दोन प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे एका केबिन क्रू सदस्याच्या लक्षात आले. एका प्रवाशाने दावा केला की दुसरा अपशब्द वापरत आहे, ज्यामुळे तात्काळ क्रू मेंबरने यात हस्तक्षेप केला. (हेही वाचा - Health Scare in Air India AI130: लंडन-मुंबई विमान प्रवासात क्रू मेंबर्स सह प्रवाशांची बिघडली तब्येत; फूड पॉयझनिंग चा अंदाज)

एअर इंडियाच्या क्रू ने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कारवाई केली आणि पीडित प्रवाशाला उर्वरित उड्डाणासाठी बिझनेस-क्लास सीटवर हलवले. विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला पुढील चौकशीसाठी विमानतळ सुरक्षेकडे सोपवण्यात आले. (हेही वाचा - Technical Snag On Air India Express Dubai Flight: एअर इंडिया एक्सप्रेसच्या दुबईला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड )

एअरलाइनने म्हटले आहे की, आमच्या केबिन क्रूने ताबडतोब दुसऱ्या प्रवाशाला लँडिंगच्या कालावधीसाठी बिझनेस-क्लास सीटवर हलवून परिस्थिती हाताळली. दुसऱ्या प्रवाशाच्या तक्रारीनंतर, पायलट-इन-कमांडने विमान दिल्लीत पोहोचल्यावर उपस्थित असलेल्या आमच्या सुरक्षा पथकाला परिस्थितीची माहिती दिली. अडथळा आणणाऱ्या प्रवाशाला पुढील चौकशीसाठी विमानतळ सुरक्षेकडे सोपवण्यात आले आहे.