Dragon Fruit Now Kamalam: फळाचे नाव बदलले, ड्रॅगन फ्रुट झाले 'कमलम' झाले; गुजरात सरकारचा निर्णय
Dragon Fruit | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भाजप (BJP) शासीत राज्यांमध्ये आतापर्यंत शहरांची नावे बदलल्याचे आपण पाहिले. पण आता चक्क फळांचीही नावे बदलण्यात आली आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Gujarat Chief Minister Vijay Rupani) यांनी मंगळवारी (19 जानेवारी 2021) ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) हे नाव बदलून त्याचे नाव 'कमलम' (kamalam) असे करण्याचा निर्णय घेतला. गुजरात सरकारने म्हटले आहे की, ड्रॅगन फळाचा आकार कमळासारखा आहे. त्यामुळे त्याचे नाव बदलून कमलम (Kamalam Fruit) असे करण्यात आले आहे. विजय रुपानी यांनी म्हटलेआहे की, हे फळाचा संबंध चीनसोबत आहे. त्यामुळे आम्ही त्याचे नाव बदलले. संस्कृत भाषेत कमलम म्हणजे कमळाचे फूल. ड्रॅगन फ्रूट हे फळ भारतात जोरदार लोकप्रिय झाल आहे. हे एक उष्णकटीबंदातील फळ आहे. त्यामुळे त्याचा स्वाद आणि चव यासाठी ते लोकप्रिय ठरत आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी हे मंगळवारी गुजरात येथील बागवाणी विकास मिशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या वेळी बोलताना रुपानी यांनी सांगितले की, आम्ही ड्रॅगन फ्रुटचे नाव कमलम असे ठेवले आहे. तसेच या फळाचे पेंटट मिळविण्यासाठीही आम्ही अर्ज केला आहे. गुजरात सरकारने निर्णय घेतला आहे की ड्रॅगन फ्रुटला गुजरात राज्यात कमलम म्हणूनच संबोधण्यात येईल. (हेही वाचा, Health Tips: भरपूर प्रमाणात 'सी' व्हिटामिन असलेले ड्रॅगनफ्रूट खाल्ल्याने 'या' आजारांपासून राहाल दूर)

मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पुढे बोलताना सांगितले की, भलेही या फळाला आगोदर ड्रॅगन फ्रूट म्हणून ओळखले जात असेल. परंतू, आता हे योग्य ठरणार नाही. हे फळ दिसायलाही कमळाच्या फुलासारखे आहे. त्यामुळे आम्ही त्याला कमलम असे नाव दिले आहे. फळाचे नाव बदलण्यामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचेही रुपानी यांनी सांगितले. कमलम शब्दाबाबत चिंता करण्याचे कारण नाही कारण कमळ हे फूल भाजपचे चिन्ह आहे. उल्लेखनीय असे की, गांधीनगर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाचे नवही कमलम असे आहे.