अमेरिकन कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनचे (Trump Organization) कार्यकारी उपाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर (Donald Trump Jr,) या महिन्यात भारत दौऱ्यावर येऊ शकतात. या दौऱ्यात ते भारतीय रिअल इस्टेट मार्केटमधील विस्ताराची घोषणाही करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांचे पुत्र आहेत. ट्रंप ऑर्गनायझेशनने ट्रिबेका डेव्हलपर्स, मुंबई यांच्या भागीदारीत भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश केला आहे.
यूएस कंपनी आणि ट्रिबेका यांनी 'ट्रम्प' ब्रँड अंतर्गत उच्च श्रेणीचे प्रकल्प विकसित करण्यासाठी लोढा समूहासह स्थानिक विकासकांशी करार केला आहे. आतापर्यंत चार उच्चस्तरीय प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून त्यापैकी एक पुणे येथील प्रकल्प पूर्ण झाला आहे. ट्रिबेका डेव्हलपर्सच्या 10 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जूनियर या महिन्यात भारताला भेट देतील, असे ट्रिबेका डेव्हलपर्सने एका निवेदनात म्हटले आहे.
या दौऱ्यात ट्रम्प ज्युनियर आणि ट्रिबेकाचे संस्थापक कल्पेश मेहता देशातील व्यवसाय विस्ताराच्या योजनांची घोषणा करू शकतात. मेहता म्हणाले, ‘ट्रिबेका आणि ट्रम्प ऑर्गनायझेशनची व्यवसाय भागीदारी दहा वर्षांपेक्षा जास्त आहे आणि काळाच्या ओघात ती अधिक मजबूत झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या उपस्थितीशिवाय 10 वर्षांचा उत्सव पूर्ण होणार नाही आणि मला आनंद आहे की ते या प्रसंगी येथे असतील.’ (हेही वाचा: आता 'पेप्सिको'च्या कर्मचाऱ्यांवरही बरोजगारीचं संकट, शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीचा निर्णय)
देशात सध्या ट्रम्पचे चार प्रकल्प आहेत. ट्रम्प टॉवर दिल्ली-एनसीआर, ट्रम्प टॉवर कोलकाता, ट्रम्प टॉवर पुणे आणि ट्रम्प टॉवर मुंबई. ट्रम्प ऑर्गनायझेशनच्या पुण्यातील पंचशील रिअॅल्टीसोबतच्या भागीदारीमुळे हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशन हा प्रत्यक्षात 500 कंपन्यांचा समूह आहे. हे सर्व डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचे आहेत.