आता आपल्याला देशातील विमान प्रवासासाठी (Air Travel) जास्त पैसे खर्च करावे लागतील. हवाई प्रवासावर तुम्हाला 30 टक्के अधिक भाडे द्यावे लागेल. सरकारच्या वेगवेगळ्या मार्गांसाठीच्या विमान भाड्यांच्या प्राइस बँडच्या वाढीचा परिणाम विमान प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या खिशावर होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत हवाई भाडे दहा ते तीस टक्के महाग झाले आहे. यासह सरकारने विमान कंपन्यांच्या प्री-कोविड क्षमतेच्या तुलनेत जास्तीत जास्त 80 टक्के क्षमतेसह उड्डाणांच्या संचालनाची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवली आहे.
ही नवीन मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे मंत्रालयाने गुरुवारी आपल्या आदेशात सांगितले. मंत्रालयाने गेल्या वर्षी 21 मे रोजी अनुसूचित देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मंत्रालयाने उड्डाण कालावधीच्या आधारावर वर्गीकृत सात 'बँड' च्या माध्यमातून हवाई भाडे लागू केले. या प्रकारच्या पहिल्या बँडमध्ये 40 मिनिटांपेक्षा कमी कालावधीची उड्डाणे आहेत. नव्या प्राइस बँडनुसार दिल्ली-मुंबई मार्गावरील इकॉनॉमी क्लासचे भाडे आता 3,900-13,000 रुपयांमध्ये असेल, पूर्वी ते 3,500 ते 10,000 रुपये होते.
एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने गेल्या वर्षी 21 मे रोजी सांगितले होते की, प्रत्येक विमान कंपनीला कमीतकमी 40 टक्के तिकिटे खालच्या आणि वरच्या मर्यादांपेक्षा कमी किंमतीला विक्री करावी लागतील. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जवळजवळ दोन महिन्यांच्या निलंबनानंतर 25 मे रोजी घरगुती प्रवासी उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. (हेही वाचा: पगाराबाबत माहिती देण्यासाठी होणार WhatsApp चा उपयोग? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; नवीन Labour Code च्या नियमांमध्ये केले बदल)
दुसरीकडे 1 फेब्रुवारीपर्यंत एअर इंडियाचे एकूण 1,995 लोक कोरोना सकारात्मक आढळले आहेत. यासह कंपनीचे 19 कर्मचारी कोरोना आणि इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही माहिती दिली.