प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशात सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून ई-सिगारेटचा (E-Cigarette) वापर सुद्धा वाढत चालला आहे. त्यामुळे देशातील 1061 डॉक्टरांनी या गोष्टीबद्दल चिंता व्यक्त केली असून ई-सिगारेटवर बंदी आणावी अशी विनवणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्रातून केली आहे. तसेच 'इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हीरी सिस्टीम' असलेल्या ई-सिगारेट, हुक्का पेन वापरण्याचे प्रमाण सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तरुणाईमध्ये ई-सिगारेट, पेन हुक्का, व्हेप्स या गोष्टींचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे देशातील डॉक्टरांनी याबद्दल चिंता व्यक्त केली असून पत्रात असे म्हटले आहे की, या सर्व गोष्टी पाईप सारख्या दिसत असल्या तरीही आरोग्याला घातक ठरतात. तर देशातील 30 संस्थानी एकत्र येऊन ई-सिगारेट विरोधात आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. तसेच संघटनांनकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयासोबत संपर्क साधला आहे.(हेही वाचा-Coca-Cola कंपनी लवकरच भारतात लॉन्च करणार छास,लस्सी आणि कैरी पन्हे)

तर टाटा मेमोरियल रुग्णामधील मुख्य आणि नेक सर्जिकल ऑन्कॉलॉजीचे उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी ही भुमिका मांडली आहे. तसेच ई सिगारेट फायदेशीर असल्याचे सर्वत्र सांगितले जात असून मात्र ते आरोग्यासाठी किती घातक ठरते याबद्दल कोणाला जास्त माहिती नाही. त्यामुळे तरुणाईंमध्ये ई सिगारेट हे सुरक्षित असल्याचा गैरसमज झाला असल्याचे ही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.