मोदींचा घटस्फोट; पत्नीला दिले २०० कोटी रुपये
(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

प्रसिद्ध फार्मा कंपनी कॅडीलाचे चेअरमन राजीव मोदी आणि त्यांच्या पत्नी मोनिका यांच्यात घटस्फोट झाला आहे. गेले प्रदीर्घ काळ दोघांमध्ये वाद सुरु होता. अहमदाबाद येथील एका कौटुंबिक न्यायालयात अखेर दोघांनी आपाल वैवाहीक प्रवास रितसर थांबवला. दरम्यान, राजीव मोदी यांनी घटस्पोट घेताना यांनी मोनिका यांना तब्बल २०० कोटी रुपये रक्कम पोटगीदाखल दिली. सुमारे २६ वर्षांपूर्वी दोघे एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले होते.

राजीव आणि त्यांच्या पत्नी मोनिका यांच्यातील वाद ऑगस्ट २०१९मध्ये प्रथमच जाहीरपणे पुढे आला होता. हा वाद पुढे आला तेव्हा, मोनिका यांनी राजीव यांच्यावर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप केला होता. मोनिका यांनी पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीत राजीव हे आपल्याला गेल्या तीन वर्षांपासून छळत असल्याचे म्हटले होते.

मोनिका यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद होताच पोलिसांनी राजीव मोदी यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये समेट घडावा यासाठीही प्रयत्न झाले. मात्र, ते पूर्ण अयशश्वी ठरले. अखेर दोघांमध्ये २०० कोटी रुपयांच्या पोटगी रकमेवर सहमती झाली. त्यानंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. (हेही वचा, अरेंज मॅरेज करत असाल तर या गोष्टी नक्की करा, नाहीतर लग्नानंतर उद्भवतील अनेक समस्या)

दरम्यान, कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटासाठी अर्ज आल्यानंतर दोघांनाही सहा महिन्यांचा (चर्चा, संवाद, समेट आणि कायदेशीर प्रक्रियेसाठीचा वेळ) कालावधी दिला होता. मात्र, दोघांकडूनही न्यायालयाला स्पष्टपणे सांगण्यात आले की, दोघांमधीलही संबंध २०१२ पासून संपुष्टात आले आहेत. त्यानंतर न्यायालयाने घटस्फोटास मान्यता देत प्रकरण निकालात काढले. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि निर्देशानुसार राजीव मोदी यांनी मोनिका यांना २०० कोटी रुपयांचा ड्रॉफ्ट न्यायालयासमोरच सूपूर्त केला. दरम्यान, दोघांपासून जन्माला आलेला मुलगा राजीब यांच्यासोबतच राहणार आहे.