Bombay High Court | (Photo Credits: ANI)

पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अभिमत विद्यापीठाच्या (Gokhale Institute of Politics and Economics, Pune) डॉ अजित रानडे (Dr. Ajit Ranade) यांना हटवल्याप्रकरणी डॉ. अजित रानडे मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. या याचिकेवर 23 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे पण तोपर्यंत त्यांना हटवण्यात आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे कोर्टाने सांगितलं आहे.

अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना कुलगुरूंच्या पदावरून हटवण्याचा निर्णय झाला आहे. त्यांना पदमुक्त करण्यासाठी 21 सप्टेंबरची वेळ देण्यात आली आहे. परंतू मुंबई उच्च न्यायालयामाध्ये 22 सप्टेंबर पर्यंत नियमित खंडपीठ नसल्याने त्यांच्या सुनावणीवर आता 23 सप्टेंबरची वेळ देण्यात आली आहे. डॉ. रानडे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी त्यांच्या याचिकेवरील सुनावणी होईपर्यंत डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायमूर्ती महेश सोनाक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर डॉ. रानडे यांची याचिका सुनावणी पार पडली आहे.

कोण आहेत डॉ. अजित रानडे?

डॉ. अजित रानडे हे अर्थतज्ञ आहेत. पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अभिमत विद्यापीठात ते कुलगुरू होते. IIT, IIM चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्राउन विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थसल्लागार, एबीएन ॲम्रो या संस्थांमध्ये काम केले आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या तज्ज्ञ समित्यांवरही ऑ. रानडे यांनी काम केले आहे. करोना काळानंतर मोफत धान्य, लसीकरण आणि स्वस्त कर्जे अशा योजनांचा त्यांनी आग्रह धरला होता.

डॉ. अजित रानडे यांना हटवण्याचा निर्णय का झाला? 

डॉ. अजित रानडे हे कुलगुरू पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करीत नसल्याचं सांगत त्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांंना 10 वर्ष अध्यपन करण्याचा अनुभव नसल्याचं कारण पुढे करत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर,  मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या सह  अनेकांनी रानडेंसोबत झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.