Representational Image (File Photo)

तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. भारतामध्ये ऑनलाईन पेमेंट यूपीआय द्वारा सुरू झाल्यानंतर QR code scams मध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसात अनेक क्यूआर कोड स्कॅम समोर आले आहेत. यामध्ये बेकरीमध्ये क्यूआर कोड स्कॅन केल्याने पोलिस ऑफिसरने 2.3 लाख गमावल्याचा एक प्रकार समोर आला आहे. सध्या DHL package delivery च्या नावे देखील एक क्यूआर कोड स्कॅम समोर आला आहे. सध्या अनेक नागरिकांना याबद्दल संशयास्पद नोटिफिकेशन मिळत आहेत.

DHL package delivery ची नोटीस व्हॉट्सअ‍ॅप आणि X वर मिळत आहे. यामध्ये कंपनीने आता नागरिकांना पेपर वर प्रिंट केलेल्या कोणत्याही क्यू आर कोड वर स्कॅन न करण्याचं आवाहन केले आहे.

काही नागरिकांना दरवाज्यावर एक नोटीस मिळत आहे. यामध्ये "तुमची डिलेव्हरी रिअरेंज करण्यासाठी 3 स्टेप्स फॉलो करा' असा मेसेज दिसतो. पहिल्यांदा कोड स्कॅन करण्यास सांगितलं जातं. याद्वारा त्यांना DHL website वर रिडिरेक्ट केलं जाईल असं सांगितलं जातं. त्यानंतर DHL Waybill number टाकून डिलेव्हरीचा पर्याय निवडण्यास सांगितलं जातं.

अशाप्रकारच्या क्यूआर कोड स्कॅन मधून नागरिकांची मोठी फसवणूक होऊ शकते. यामध्ये पैसे गमावले जाऊ शकतात.