नागपूर दीक्षाभूमी । PC: InfoVidarbha

दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी बौद्ध धर्मीय नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartan Din) साजरा करतात. मात्र यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी तो साजरा करता येणार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यात 7 ऑक्टोबर पासून प्रार्थनास्थळं खुली करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे पण गर्दी टाळण्यासाठी यंदाही दीक्षाभूमी वर प्रवर्तन दिन निमित्त आयोजन न करण्याचा निर्णय झाला आहे. नागपूर जिल्हा प्रशासनानं याविषयी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.

विजयादशमी, 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये राहणार असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोवीड- 19चा प्रोटोकॉल पाळणे शक्य नसल्याचे सर्व संस्था व विभागाचे मत आहे. त्यामुळे यावर्षी अभिवादन सोहळा होऊ शकणार नाही असे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाने धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे.(नक्की वाचा: Break The Chain: मुंबई महापालिकेकडून धार्मिक स्थळांसाठी नियमावली जाहीर, भाविकांना 'या' नियमांचे करावे लागणार पालन).

INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR ट्वीट  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी बुध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत अनेक भीम अनुयायी दसर्‍याला दीक्षाभूमीवर येतात.