राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाचे घटते प्रमाण पाहता दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) एक मोठी घोषणा केली आहे. शनिवारी डीडीएमएने एक आदेश जारी केला आहे, या आदेशात म्हटले आहे की, 26 जुलै रोजी पहाटे पाच वाजेपासून दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि बसला 100% क्षमतेसह ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच वेळी, सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स 50% क्षमतेसह उघडतील. डीडीएमएच्या या निर्णयानंतर आता सोमवारपासून प्रवाशांना दिल्ली मेट्रोच्या सर्व जागांवर आणि बसमधील सर्व सीट्सवर बसता येणार आहे.
दिल्ली सरकारने डीडीएमएकडे यापूर्वीच हा प्रस्ताव पाठविला होता. गेल्या काही दिवसांपासून डीडीएमए यावर विचार करीत होता. अखेर शनिवारी डीडीएमएने ही अधिसूचना जारी केली. दिल्ली सरकारने या संदर्भातील प्रस्ताव कालच दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविला होता. यासह डीटीसी आणि क्लस्टरच्या बसमधील क्षमताही शंभर टक्के करण्यात आली. नव्या नियमांतर्गत आता 50 ऐवजी 100 लोक लग्न सोहळ्यात सहभागी होऊ शकतील. तर अंत्यसंस्कारात 20 ऐवजी 100 लोक सहभागी होऊ शकतील.
Metro and buses are permitted to operate with 100% capacity in Delhi from 5 am, July 26. Cinema halls, theatres, and multiplexes will function with 50% capacity: Delhi Disaster Management Authority pic.twitter.com/DSS0W0MKKS
— ANI (@ANI) July 24, 2021
26 जुलैपासून स्पालादेखील अटींसह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांना प्रत्येक पंधरवड्यात आरटी-पीसीआर चाचणी किंवा संपूर्ण लसीकरण (लसीचे दोन्ही डोस) घेणे बंधनकारक असेल. यावेळी सरकारने व्यवसाय प्रदर्शन सुरू करण्याची परवानगी दिली आहे, परंतु केवळ व्यावसायिक पाहुणेच त्यात सहभागी होऊ शकतील. (हेही वाचा: दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटल मध्ये Brain Tumor Surgery होत असताना 24 वर्षांची रूग्ण पूर्ण वेळ करत होती हनुमान चालीसा चं पठण)
दिल्लीत एप्रिल महिन्यात लागू केलेल्या लॉकडाउननंतर 31 मेपासून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 7 जूनपासून 50 टक्के क्षमतेसह दिल्ली मेट्रो सुरू करण्यात आली. त्याच बरोबर 50 टक्के क्षमतेसह बससेवा आधीच चालू होती. दरम्यान, गेल्या 24 तासांत दिल्ली कोरोनाच्या 66 रुग्णांची नोंद झाली असून, एकही मृत्यू झाला नाही. आज 52 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्लीत 587 सक्रीय रुग्ण आहेत.