कोरोना व्हायरसने चीन पाठोपाठ आता युरोपामध्ये थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. अशामध्ये इटलीच्या रोम शहरात शिकणार्या 263 विद्यार्थांना घेऊन एअर इंडियाचं विशेष विमान भारतामध्ये दाखल झालं आहे. आज (22 मार्च) दिवशी सकाळी 9.15 वाजता दिल्लीत विमान दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ITBP Chhawla येथे क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांचं थर्मल स्क्रिनिंग आणि इमिग्रेशनची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या दिवसेंदिवस युरोपात आणि प्रामुख्याने इटली, स्पेनमध्ये ढासळत असलेली स्थिती पाहता तेथील लॉकडाऊनमध्ये आता नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
दिल्लीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून त्यांची सरकारकडून खास सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली आहे. अमेरिका, जर्मनी मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष सोय; मदतकेंद्रांची यादी जाहीर.
Delhi Customs continue to provide its assistance in clearance of the 263 passengers from Rome at the remote bay at the airport. All precautions being exercised and standard operating procedures (SOPs) for handling passengers being followed. #COVID19 https://t.co/0qZvARpQ7G
— ANI (@ANI) March 22, 2020
इटलीमध्ये मागील काही दिवसांपासून विळखा घट्ट होत आहे. चीनमध्ये जेथे कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली त्यापेक्षाही अधिक बळी युरोपातील इटली शहरामध्ये गेले आहे. मागील अनेक दिवसांपासून स्थानिकांनी लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला आहे. दरम्यान येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सार्याच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. नागरिकांवरील बंधनं वाढवण्यात आली आहेत. केवळ अति महत्त्वाच्या सेवा इटलीमध्ये सुरु ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार, 53,578 जण कोरोना बाधित आहेत. तर मृतांचा आकडा 4,825 पर्यंत पोहचला आहे.