ISIS च्या कार्यकर्त्याला अटक, IED स्फोटकांसह एक पिस्तुल जप्त: दिल्ली पोलिस विशेष सेल
ISIS Opreator Arrested (Photo Credits: ANI)

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2020: शुक्रवारी 21 ऑगस्ट रात्री उशिरा रिज रोड भागात झालेल्या चकमकीनंतर दिल्ली पोलिस विशेष सेल ने ISIS च्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे. दोन इम्प्रोव्हाइज्ड स्फोटक यंत्र (आयईडी) दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सदर इसमास ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी एकटा होता आणि तो हल्ल्याची योजना आखत होता.शनिवारी सकाळी पत्रकारांना माहिती देताना पोलिस उपायुक्त (विशेष सेल) प्रमोद सिंह कुशवाहा म्हणाले की, अब्दुल युसुफ खान अशी ओळख पटविलेल्या आयएसआयएस एजंटला अटक करण्यापुर्वी सहा वेळा गोळीबार झाला. आरोपींकडून पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अब्दुल युसुफ खान हा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असुन त्याला धौला कुआन आणि करोल बाग या वाटेतील रिज रोड वरून बाईक वरुन जात असताना गोळीबारानंतर अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन आयईडी जप्त केले आहेत. यानंंतर आता राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडो तर्फे रिज रोड परिसरातील बुद्ध जयंती पार्क जवळ शोध मोहीम सुरु आहे,

ANI ट्विट

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नवी दिल्ली रेंजची टीम त्यांच्या हालचालीचा मागोवा घेत होती. शुक्रवारी संध्याकाळी त्यांना समजले की तो रिज परिसरात येणार आहे. या माहितीवर आधारित कारवाई करुन सापळा रचला गेला आणि आरोपीला अटक करण्यात आली