दिल्लीतील शाळा उद्या (सोमवार) पासून पुन्हा उघडतील (Delhi School Reopen) कारण हिवाळ्याची वाढीव सुट्टी संपत आहे, परंतु थंडीची लाट (Cold Wave) आणि धुक्याच्या परिस्थितीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून वर्गाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सकाळी 9 वाजेपूर्वी कोणतेही वर्ग सुरू होणार नाहीत आणि सायंकाळी 5 वाजेच्या पुढे कोणतेही वर्ग चालणार नाहीत, असे शिक्षण विभागाने (Education Department) रविवारी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर राहावे लागेल, असे आदेशात म्हटले आहे. “सरकारी, सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त खाजगी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी 15/01/2024 (सोमवार) पासून त्यांच्या संबंधित शाळांमध्ये सामील व्हावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये नर्सरी, केजी आणि प्राथमिक वर्गांचाही समावेश आहे,” असे आदेशात म्हटले आहे. (हेही वाचा - Delhi Weather Update: राजधानी दिल्लीमध्ये किमान तापमान 5.8 अंश सेंटीग्रेड)
7 जानेवारी रोजी दिल्लीचे शिक्षण मंत्री अतिशी यांनी जाहीर केले की राष्ट्रीय राजधानीत सध्या सुरू असलेल्या थंड लाटेच्या परिस्थितीत हिवाळी सुट्टी 12 जानेवारीपर्यंत वाढवली जाईल. "नर्सरी ते इयत्ता 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या थंड हवामानामुळे दिल्लीतील शाळा पुढील 5 दिवस बंद राहतील," असे आतिशी यांनी यापूर्वी ट्विट केले होते.