Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील दोन प्रमुख शाळा, आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि पश्चिम विहारमधील जीडी गोयंका पब्लिक स्कूल यांना सोमवारी सकाळी 9 डिसेंबरला ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या (Bomb Threat) मिळाल्या. सकाळी 7 च्या सुमारास दिल्ली अग्निशमन विभागाला या धमक्यांबाबत सतर्क करण्यात आले. धमकीला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही शाळांनी विद्यार्थ्यांना घरी (,Delhi Bomb Threat) पाठवले. पोलिसांसह अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून सध्या शाळेत तपास सुरू आहे. (हेही वाचा:Bomb Threat at Summer Fields School in Delhi: दिल्ली शाळेला धमकीचा ईमेल पाठवणारा अखेर सापडला, शाळेत न जाण्यासाठी विद्यार्थ्यांनेच केला कारनामा)
राजधानी दिल्लीतील दोन नामांकित शाळांना बॉम्बने हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ मुलांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या घरी परत पाठवले आणि या प्रकरणाची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. (Air India Flight Receives Bomb Threat: दिल्ली-इंदूर-मुंबई मार्गावरील एअर इंडियाच्या विमानाला आज पुन्हा बॉम्बची धमकी; FIR दाखल)
Two schools in Delhi received bomb threats via e-mail - one in RK Puram and another one in Paschim Vihar. School administrations have sent children back to their homes. Fire and police informed: Delhi Police
— ANI (@ANI) December 9, 2024
विशेष म्हणजे शाळांना बॉम्ब ठेवण्याचा ईमेल येण्याची ही पहिलीच घटना नाही, तर याआधीही दिल्लीतील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल आले आहेत. तपासादरम्यान अशा सर्व धमक्या खोट्या असल्याचे आढळून आले.