Ram Nath Kovind to visit Arun Jaitely (Photo Credits: Twitter/ ANI)

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind ) आज माजी अर्थमंत्री आणि भाजपा नेते अरूण जेटली (Arun Jaitley) यांची दिल्ली येथील एम्स रूग्णालयात भेट घेणार आहेत. मागील आठवड्याभरापासून अरूण जेटलींवर एम्स  (AIIMS) रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 9 ऑगस्टच्या सकाळी प्रकृती अस्वस्थ्यामुळे अरूण जेटलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. 11 च्या सुमारास अरूण जेटलींच्या भेटीसाठी राष्ट्रपती रूग्णालयात दाखल होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मंडळात अरूण जेटली यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र त्यानंतर आरोग्याच्या समस्या वाढत गेल्याने सक्रिय राजकारणापासून अरूण जेटली दूर गेले आहेत. काही काळ त्यांच्यावर अमेरिकेतील रूग्णालयातही उपचार झाले होते. मात्र नंतर एका खास ट्विटच्या माध्यमातून मंत्रिमंडळात समावेश न करण्याबाबत विचार करावा असं त्यांनी आवाहन केलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणूक 2019 आणि त्यानंतर बनवण्यात आलेल्या मंत्रिमंडळातून त्यांना वगळयात आले.

ANI Tweet

अरूण जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काही दिवसांपूर्वी व्यंकय्या नायडू यांनी एम्स रूग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे.