भाजप मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु; कर्नाटकशी धागेदोरे जुळत असल्याचा संशय
BJP's 2019 Lok Sabha Election Slogan (Photo Credits: BJP/Twitter)

दिल्ली (Delhi ) येथील 6 ए दीनदयाळ उपाध्याय मार्ग (6-A, Deen Dayal Upadhyaya Marg, New Delhi)  स्थित भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janta Party) मुख्य कार्यालय  (Bjp Headquarters)  बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर दिल्ली पोलीस खडबडून जागे झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे. मात्र, ही धमकी खोटी असल्याचे बोलले जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला या धमकीचा कर्नाटकशी धागेदोरे जुळत असल्याचीह संशयात्मक चर्चा आहे.

मध्य दिल्लीतील  (Delhi Police, DCP Central) डीसीपींच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, धमकीचा हा फोन कर्नाटक येथील म्हैसुर येथून आला होता. पोलिसांनी या फोननंतर तपास सुरु केला आहे. तसेच, कर्नाटक पोलिसांशीही याबाबत संपर्क केला जात असल्याचे म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, डीडीयू मार्ग स्थित भाजप मुख्यालयाच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचा फोन शनिवारी सकाळी साधारण 11 वाजता आला. धमकीचा फोन आल्याची माहिती मिळताच पोलिस तातडीने भाजप मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी भाजप मुख्यालयाची कसून तपासणी केली. काही वेळाने माहिती पुढे आली की, हा फोन कर्नाटक राज्यातील म्हैसुर येथून आला होता. (हेही वाचा, नवी मुंबई: कळंबोली येथील सुधागड शाळेजवळ बॉम्ब सापडल्याने खळबळ)

दरम्यान, पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा छडा लावल्याचे वृत्त आहे. असेही सांगितले जात आहे की, धमकीचा फोन करणारा व्यक्ती मानसिक विकलांग आहे. त्याने या आधीही अनेकदा चुकीच्या पद्धतीने फोन कॉल केले आहेत. परंतु, हे प्रकरण बरेच हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.