दिल्लीत गेल्या 118 वर्षातील थंडीचा रेकॉर्डब्रेक, तापमानाचा पारा 2.4 डिग्रीवर पोहचला
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit-IANS)

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिक गारठून गेले असून घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तर दिल्लीत गेल्या 118 वर्षातील थंडीने रेकॉर्डब्रेक केला असून तापमानाचा पारा 2.5 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहचला आहे. शुक्रवारी 4.2 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. थंडीपासून थोडा बचाव करण्यासाठी वारंवार शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीचा परिणाम लोकांसह प्राण्यांवर सुद्धा झाला आहे.

हवामान खात्यानुसार, यापूर्वी 1901 मध्ये तापमानाचा पार 2.5 डिग्रीवर पोहचला होता. त्यानंतर 118 वर्षानंतर आता डिसेंबर महिन्यात जबरदस्त कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र दिल्लीतील हवामानात काही बदल होणार नसल्याचे सांगण्याात आले आहे. मात्र 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.असे सांगितले जात आहे की, थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल याची चिन्ह दिसून येत नाही आहे. हिमालय क्षेत्रातून सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीमुले आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनुळे मैदानी क्षेत्रात थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीच्या कारणामुळे दिल्ली-एनसीार येथे प्रदूषणाचा स्तरात सुद्धा वाढ वेगाने होत आहे.(दिल्ली सह उत्तर भारतामध्ये थंडीचा पारा खालावला; 1907 नंतर तापमान निच्चांकांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला अंदाज)

ANI Tweet:

दिल्लीमध्ये 1997 नंतर सलग दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ थंडीचा पारा खालावण्याचा यंदा रेकॉर्ड झाला आहे. 1997 मध्ये सलग 17 दिवस थंडी पडली होती. डिसेंबरमध्ये 20 अंश पेक्षा कमी तापमान यापूर्वी 1919, 1929,1961,1997 साली नोंदवण्यात आलं आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा दिल्लीचं तापमान 4 अंश पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.दिल्ली प्रमाणेच राजस्थान, फत्तेपूरमध्ये थंडीचा पारा खालावला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस तापमान शून्य अंश तापमानाच्या आसपास आहे. त्यामुळे उत्तर भारतातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.