Delhi-Mumbai Expressway Accident: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर कारला ट्रकची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Delhi-Mumbai Expressway Accident | (Photo Credits: X)

राजस्थानच्या (Rajasthan) दौसा येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात (Accident on Delhi-Mumbai Expressway) एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी (12मे) सकाळी घडली. अपघातातील पिडीत कुटुंब अहमदाबादहून हरिद्वारला जात होते. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आणि जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गाय वाचवताना अपघात

पोलिसांनी अपघाताबद्दल दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने निघालेल्या कारसमोर एक गाय आली. गाईला वाचवीण्यासाठी चालकाने कारचा वेग नियंत्रीत करुन ती रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कारचा वेग अचानक कमी झाल्याने पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली आणि कारचा अपघात झाला. त्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला आणि कारमधील तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बंदिकुई हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी म्हटले. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Rajasthan Road Accident: राजस्थानमध्ये कारचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू)

एक्स पोस्ट

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी एक अपघात

दरम्यान, राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात कारला ट्रकने धडक दिल्याने 5 मे रोजी एकाच कुटुंबातील किमान सहा जण ठार झाले, तर दोन जण जखमी झाले. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. हे कुटुंब सवाई माधोपूर येथील गणेश मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जात होते. दरम्यान, ही घटना घडली असे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Youth Died After Falling From A Local Train: धक्कादायक, लोकलमधून पडून आणखी एका तरुणाने गमावला जीव, दोन महिन्यात पाचवी घटना)

उत्तर प्रदेशमध्येही लग्नाच्या मांडवात अपघात

उत्तर प्रदेशमधील आणखी एका घटनेत लग्नाच्या मांडवातच अपघात घडला. ही घटना बुडाऊनमधील उझनी येथे शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वराच्या जवळच्या नातेवाईकाने रागाच्या भरात कार भरधाव वेगाने मांडवात घुसवली. ज्यामुळे लग्नाला हिंसक वळण लागले. या घटनेत एका लहान मुलासह 11 जण गंभीर जखमी झाले. अमल उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, बरेलीच्या बिसरतगंज येथील रहिवासी नातेवाईक आणि वराचे नातेवाईक यांच्यात मिरवणुकीदरम्यान वीज केंद्राजवळ वाद झाला. या वादानंतर वराच्या नातेवाईकाचा काकांचा संयम सुटला आणि त्यांनी आपली कार गर्दीत भरधाव वेगाने नेली. कारचा वेग अतिशय अनियंत्रीत असल्याने कारसमोर येणारा प्रत्येकजण जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ही घटना इतकी भयावह होती की, कारसमोर येणाऱ्या लोकांना बचावाची संधीही मिळाली नाही.