भारतीय वायुसेनाने एअर स्ट्राईक केल्यानंतर भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) सीमेवर दोन्ही देशात तणाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही राज्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेत दिल्लीची लाईफ लाईन म्हणजेच दिल्ली (Delhi) मेट्रोसाठी ही हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षा एजिंसीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अलर्टमुळे प्रत्येक दोन तासांनी स्टेशनसह कार पार्किंग परिसर आणि अन्य स्थानकांवर तपासणी करण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही प्रकारची संशयास्पद गोष्ट आढळून आल्यास त्याची माहिती मेट्रो स्टेशनच्या कंट्रोल रुमला देण्यात यावी असे अवाहन करण्यात आले आहे.
भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) पाकव्याप्त काश्मिरवर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान तणतणला आहे. मात्र असे सांगितले जात आहे की,दहशतादी भारतातील मोठ्या शहरात हल्ला करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी पोलिसांसह सुरक्षणा यंत्रणा सतर्क राहणार आहे. त्यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.(हेही वाचा-संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा मोठा निर्णय; 2700 कोटींची शस्त्रे खरेदीला तातडीची मंजुरी)
तर 14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मिर मधील पुलवामा येथे दहशवाद्यांनी सीआरपीफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यामुळे भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला या हल्ल्याचे प्रतिउत्तर देत त्यांच्या बालकोट येथे हल्ला केला. वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची मुख्य तळे उद्ध्वस्त झाली आहेत.