पाश्चात संस्कृतीला आत्मसात करण्यात भारतीय लोक नेहमीच अग्रस्थानी असतात. मग ते कपडे असो वा खाद्यपदार्थ. 'मॅकडोनाल्ड' (McDonalds)हे त्यातलेच एक उदाहरण. मात्र ह्या मॅकडोनाल्ड चक्क एका भारतीय ग्राहकामुळे 70 हजारांचा भुर्दंड द्यावा लागणार आहे. दिल्लीत राहणा-या ह्या ग्राहकाला पाच वर्षांपूर्वी मॅकडोनाल्डच्या बर्गरमध्ये अळ्या सापडल्या होत्या. या प्रकरणात जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहकाला 70 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
पूर्व दिल्लीत राहणारे संदीप सक्सेना 10 जुलै 2014 रोजी नोएडातील जीआयपी मॉलमधील मॅकडोनाल्डमध्ये गेले होते. तेथे त्यांनी बर्गर घेतला. तो खाल्ल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी बर्गरमध्ये पाहिलं असता, त्यांना अळ्या सापडल्या. थोड्या वेळानं त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांनी मॅनेजरच्या कानावर ही बाब घातली. तसंच पोलिसांनाही बोलावून घेतलं. काही वेळानं सक्सेनांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी हा बर्गर निष्कृष्ट दर्जाचा असून त्यातील अळ्यांमुळे हा त्रा, झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार संदीप सक्सेना यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारणाकडे धाव घेतली.
Mcdonaldsच्या सॉसमध्ये आढळले चक्क किडे; व्हिडीओ व्हायरल
अखेरीस या प्रकरणाची गंभीर दखल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगानं घेतली होती. सक्सेना यांना भरपाईपोटी ७० हजार रुपये देण्याचे आदेश आयोगानं मॅकडोनाल्डला दिले. त्यात ८९५ रुपये उपचारखर्च, मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये आणि खटल्यावरील २० हजार रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. तसेच ६० दिवसांच्या आत भरपाई न दिल्यास ९ टक्के व्याज द्यावा लागेल, असेही या आदेशात म्हटले आहे.
याआधीही इंग्लंडच्या कॅम्ब्रिज शहरातील Mcdonaldsच्या केचअप डिस्पेंसरमध्ये जिवंत किडे आढळल्याची घटना घडली होती.