भारतामधील एक लोकप्रिय फूडचेन म्हणून Mcdonaldsकडे पहिले जाते. आजही पोट भरण्यासाठी तसेच पार्टी करण्यासाठी लोक Mcdonaldsला प्राधान्य देताना दिसून येतात. Mcdonald मधील विविध प्रकारचे बर्गर्स आणि त्यावर टोमॅटो सॉस घालून त्याचा ताव मारणे हा तर अनेकांचा रोजचा उद्योग आहे. मात्र आता इथूनपुढे हे करण्याआधी तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागेल, कारण इंग्लंडच्या कॅम्ब्रिज शहरातील Mcdonaldsच्या केचअप डिस्पेंसरमध्ये जिवंत किडे आढळले आहेत.
बेला रिची नावाच्या एका महिलेने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. टोमॅटो सॉसमधून किडे निघल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Never going near the ketchup in @McDonalds again. For those of you who can’t tell, these are MAGGOTS pic.twitter.com/7B3khnDwME
— Isabella (@bellaritchie00) October 3, 2018
किडे आढळल्यानंतर बेलाने लगेच इतर लोकांना तो सॉस खाण्यापासून रोखले आणि Mcdonaldsच्या स्टाफला याबाबत कल्पना दिली, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी बेलाने वरिष्ठांना याबाबत मेल लिहून कळवले, त्यानंतर Mcdonalds च्या एका प्रवक्त्याने, ही फार मोठी चूक असल्याचे कबूल केले आहे आणि यासाठी त्यांनी माफीही मागितली आहे.
याआधीही Mcdonaldsमध्ये वापरली जाणारी भांडी अथवा डिस्पेंसर्स स्वच्छ नसल्याच्या कारणामुळे वाद झाला होता. आता परत तीच चूक Mcdonaldsकडून घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.