देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने पोलिसांच्या चौकीसमोर आपली बाईक पेटवली आहे. नदीम नावाच्या या व्यक्तीने पोलिसांवर व पोलीस स्टेशनवरही दगडफेक केली. एका महिलेच्या तक्रारीवरून एका पोलीस कर्मचाऱ्याने नदीमला थप्पड मारली होती. या कथित थप्पडचा बदला घेण्यासाठी नदीम एक दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने केलेल्या कृत्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवार (25 ऑक्टोबर 2022) रोजी घडली.
सध्या नदीमच्या या कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस स्टेशनसमोर दुचाकी जळताना दिसत आहे. ती दुचाकी नदीमची असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अनेक पोलीस मिळून नदीमला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असलेलेही दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये नदीमवरील पोलिसांच्या कारवाईला आजूबाजूचे लोक समर्थन करताना दिसत आहेत. त्याच लोकांपैकी कोणीतरी हा व्हिडिओ बनवून व्हायरल केला आहे.
Nadeem, pelted stones at Khan Market Police post
Set bike on fire
He works with @zomato
It happened in Lutyen Delhi @CPDelhi @DelhiPolice@LtGovDelhi@PMOIndia pic.twitter.com/hnQshLAx3B
— Atulkrishan (@iAtulKrishan) October 25, 2022
या व्हिडीओमध्ये नदीम पोलिसांशी भांडताना तसेच घटनास्थळी जमलेल्या लोकांना धमकावत असल्याचेही दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 33 वर्षीय मोहम्मद नदीम झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी मॅन म्हणून काम करतो. तो दिल्लीतील हौजरानी भागातील मालवीय नगरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. असे म्हटले जात आहे की, एक दिवसापूर्वी खान मार्केटमध्ये एका महिलेने नदीम आपल्याकडे टक लावून पाहत असल्याची तक्रार केली होती. (हेही वाचा: Crime: कर्जाच्या मोबदल्यात बहिणी-मुलींचा होतोय लिलाव, जातपंच बोलावण्यासाठी प्रत्येक वेळी 50 हजार रुपये होतात खर्च)
या घटनेबाबत कोणतीही लेखी तक्रार नोंदवली नसल्याने पोलिसांनी नदीमला खडसावले आणि सोडून दिले. मात्र नदीमने आरोप केला आहे की, पोलीस कर्मचाऱ्याने त्याला थप्पडही मारली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नदीम पेट्रोल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तिथे त्याने स्टेशनबाहेर आपली दुचाकी पेटवून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी नदीमला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची त्यांच्याशी हाणामारी झाली. या घटनेमध्ये स्टेशनमधील काही कागदपत्रेही जळाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या नदीम पोलिसांच्या ताब्यात आहे.