(संग्रहित, संपादित प्रतिमा)

दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High Court) एका बलात्काराच्या प्रकरणात (Rape Case)  एफआयआर (FIR) रद्द करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी पुरूषाने दोन अनाथांना चांगल्या दर्जाचा बर्गर खाऊ घातला असल्याच्या कृतीला लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग (Justice Jasmeet Singh) यांनी हा निर्णय दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिंग यांनी आरोपी आणि तक्रारदार यांनी आता एकमेकांशी लग्न केल्याची बाब अधोरेखित केली आहे. त्यांच्यामधील बेबनाव हा वैवाहिक आयुष्यातील असल्याचंही ते म्हणाले आहेत. आता त्यांच्यामधील वाद मिटले आहे. त्यांच्यात सेटलमेंट झाली आहे.  (हेही वाचा, Sakinaka Rape and Murder Case: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी दोषी, पीडितेला 8 महिन्यांनी मिळाला न्याय).

न्यायमूर्ती सिंग यांनी मते 2020 मध्ये दाखल झालेला एफआयआर त्यासोबत पोलिसांचा वेळ आणि न्यायालयाचा वेळ अशा एखाद्या प्रकरणामध्ये वाया घालवण्यापेक्षा इतर महत्त्वाच्या प्रकरणामध्ये वापरणं अधिक उचित ठरेल. त्यामुळे याचिकाकर्त्याने काही समाजासाठी चांगलं काम करावं.

याचिकाकर्ता नोएडा आणि मयूर विहार भागात बर्गर रेस्टॉरंट चालवतो. न्यायालयाने सांगितले की, त्याने प्रत्येकी किमान 100 मुले असलेल्या दोन अनाथाश्रमांना चांगल्या दर्जाचे बर्गर द्यावेत.

पोलिसांनी बर्गर चांगल्या दर्जाचे आहेत की नाहीत हे पहावं. चांगल्या स्थितीत आणि कोविड प्रोटोकॉलची काळजी घेत तयार केलेले आहेत की नाही हे पहावं असंही म्हटलं आहे.