दिल्ली (Delhi) मध्ये राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये (Women and Child Development Department)एका अधिकार्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतापजनक बाब म्हणजे त्याने हा बलात्कार आपल्या मित्राच्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला आहे. आरोपीच्या पत्नीवरही या प्रकरणामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी मदत केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात पोक्सो अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीतेवर St Stephen’s Hospital मध्ये anxiety attack वर उपचार सुरू असताना तिच्यावर बालात्कार झाल्याची घटना समोर आली. हॉस्पिटल मध्ये काऊंसलिंग सुरू असताना Deputy Director कडून अनेकदा बलात्कार झाल्याचं तिने सांगितलं आहे. हॉस्पिटल कडून ही माहिती Burari Police Station ला कळवण्यात आली आणि त्यानंतर आरोपीवर FIR दाखल करण्यात आला आहे. सेक्शन 154 अंतर्गत पीडीतेची मेजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट देण्याची स्थिती नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पीडीत मुलगी गरोदर असल्याचं सांगितलं जात आहे. तिचा गर्भपात करण्यासाठी दबाव असल्याने पीडीतेची प्रकृती नाजूक असल्याचेही Swati Maliwal म्हणाल्या आहेत.
पीडीतेचे वडिल 1 ऑक्टोबर 2020 मध्ये मृत्यू पावल्यानंतर ती आरोपींकडे रहायला होती. या गोष्टीचा फायदा घेत त्या मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचं ऑफिसरने सांगितलं आहे.
सध्या आरोपी आणि त्याच्या पत्नीवर कलम 376 2f,506,509,323,313,34,120 B, आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पत्नीने देखील या गुन्ह्यात साथ दिल्याने तिच्याविरूद्ध 120-B क्रिमिनल कॉन्सपिरसीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीत मुलगी 12वीची विद्यार्थीनी आहे. सिव्हिल लाईन भागातील शाळेत ती जात होती. 2020 मध्ये तिच्या वडिलांचं निधन झाले त्यानंतर तिला आरोपीकडे आणण्यात आले होते. दरम्यान पीडीतेचे पालक सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत.
#WATCH | "A government officer who was sitting on the post of Deputy Director in the Women and Child Development Department for so long, has been accused of raping a 16-year-old minor girl and when she got pregnant, he and his wife tried to abort the pregnancy. We have issued… pic.twitter.com/3KbgNWICeF
— ANI (@ANI) August 21, 2023
Delhi Commission for Women च्या चेअरपर्सन Swati Maliwal यांनी या प्रकरणी आरोपीला तातडीने अटक व्हावी अशी मागणी केली आहे. यासाठी दिल्ली पोलिसांना आणि सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर गांभीर्याने चौकशी व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.