नवी दिल्लीतील (Navi Delhi) तळीरामांसाठी आनंदाची बातमी! कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) तिस-या लॉकडाऊनमध्ये सुरु झालेल्या मद्य विक्रीवर (Liquor) आकारला जाणारा 70% 'स्पेशल कोरोना फी' (Special Corona Fee) कर मागे घेण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 10 जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. अनलॉक 1 (Unlock 1) हळूहळू दिल्लीतील लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहे. त्याचबरोबर उद्यापासून म्हणजेच 8 जूनपासून नवी दिल्लीत अनेक लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येत आहेत. ज्यात अनेक दुकाने, मॉल्स सुरु होणार आहेत.
नवी दिल्लीत उद्यापासून रेस्टॉरंट, मॉल्स आणि प्रार्थनास्थळे सुरु होणार आहेत. मात्र हॉटेल्स आणि बँक्वेट हॉल बंदच राहतील असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर दिल्ली सीमा हद्द देखील उद्यापासून खुली करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. Coronavirus: दिल्लीत दारूच्या किंमती वाढल्या; सरकारने MRP वर लावला 70 टक्के ज्यादा 'स्पेशल कोरोना फी' कर
Delhi Government has decided to withdraw the 'special corona fee' levied at 70% of the maximum retail price on all categories of liquor, with effect from 10th June 2020. pic.twitter.com/vDn3LPcA8p
— ANI (@ANI) June 7, 2020
#WATCH LIVE: Delhi CM Arvind Kejriwal addresses the people of Delhi. #COVID19 https://t.co/TBlzl3A7TR
— ANI (@ANI) June 7, 2020
या सोबत कोरोना व्हायरसची बाबत दक्षता घेत कोरोना रुग्णांसाठी जून अखेरीस 1500 बेड्सची सोय करण्यात येईल. दिल्ली रुग्णालये ही केवळ दिल्लीतील लोकांसाठीच असतील तर केंद्रीय रुग्णालये मात्र सर्वांसाठी खुली असतील असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
लोकांनी जास्तीत आपल्या कुटूंबाशी संवाद साधून घरातच राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. जिथे न्युरो सर्जरी वा अन्य सर्जरी होतात अशी खाजगी रुग्णालये देखील केवळ दिल्लीकरांसाठी खुली असतील असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.