सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण झाल्याचे दिसून आल्यानंतर आता पुन्हा दर वाढले आहेत. तर चांदीच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटी यांच्या अनुसार, दिल्ली येथे सोन्याचे दर 71 रुपयांनी वाढले असून आता 38,564 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने भारतीय सोन्याचांदीच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. गुरुवारी चांदीचे दर 359 रुपयांनी वाढले आहेत.
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे भाव 71 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा परिणाम झाल्याने सोने-चांदी दर वाढ झाली आहे. तर बुधवारी सोने 38,493 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्याचसोबत युएस फेडरल रिझर्व्ह यांनी बुधवारी 2020 पर्यंत प्रमुख व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत. तर व्याजदरात कोणताही बदल न करण्याच्या निर्णयामुळेच त्यांच्या किंमतीत वाढ होत आहे.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)