सोन्याचे दर गेल्या दिवसात कमी झाले होते. मात्र आता पुन्हा सोन्याचे दरात वाढ झाली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे तर 130 रुपयांनी वाढले असून 38,690 रुपये प्रती 10 ग्रॅम झाले आहेत. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 38,560 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. त्याचवेळी सोन्याचे दर सुद्धा वाढले होते. चांदीचे दर 900 रुपयांनी वाढून 47,990 रुपये झाला होता. गेल्या आर्थिक वर्षात चांदीचे भाव 47,090 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजार, न्यूयॉर्क येथे सोन्याचे दर 1518 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.87 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर बाजारातून तुम्ही ज्या किंमतीत सोने खरेदी करता ती त्यावेळची किंमत असते. मात्र बहुतांश करुन राज्यातील सराफा असोशिएशनचे सदस्य मिळून बाजार सुरु झाल्यानंतर सोन्याचा दर ठरवतात. त्याचसोबत शहरानुसार सोन्याचे दर विविध असतात. तर स्पॉट मार्केट मध्ये सोन्याची किंमत शुद्धतेवर आधारित असून त्यानुसार ठरवली जाते. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत सुद्धा वेगळी असते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोने दरासोबत चांदीही वधारत होती. चांदी प्रति किलो 51,489 रुपये इतक्या उच्चांकी दरावर पोहोचली होती. मात्र चांदी दरातही मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पाहायला मिळाले. चांदीचा दर प्रति किलो 5 हजार रुपयांनी कमी होऊन तो 47,310 रुपयांवर स्थिरावला होता.(सोने, चांदी दर उतरले, ग्राहकांना दिलासा)
सोन्याच्या बाजारात किंवा सराफाच्या दुकानात सोन हे विविध स्वरूपात उपलब्ध असते. 24k, 22k आणि 18k कॅरेट मध्ये त्याची शुद्धता तपासली जाते. तुम्ही सोनं का घेताय? यावर तुम्ही ते कोणत्या स्वरूपात घ्यायला पाहिजे हे ठरते. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध आणि महाग असते. त्या खालोखाल 23कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोन उपलब्ध असते. सोनं विकत घेताना त्याची शुद्धता तपासून घ्या.हॉलमार्कचे दागिने, त्याचा स्टॅम्प आणि पक्क बिल घेऊनच दागिने विकत घ्या. तसेच दागिने विकत घेतानाच भविष्यात त्यामध्ये बदल करायचे झाल्यास,विकायचे असल्यास काय करता येईल हे विचारून योग्य सोन्याची निवड करा म्हणजे फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळता येईल.