Delhi Assembly Elections 2020: दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तर दिल्लीत 70 जागांसाठी मतदान पार पडले असून निवडणूकीत आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. मात्र भाजपकडून आपचे सरकार पाडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. मतदानादरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत पोलिस बंदोबस्त करण्यात आला. या निवडणूकीचा निकाल 11 फेब्रुवारीला लागणार आहे. या मतदानानुसार सर्व प्रसारमाध्यमे मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल (Exit Poll) दाखविण्यात येतो. यात निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र काय असेल? याचा अंदाज वर्तविण्यात येतो. Delhi Assembly Election ABP News Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक एबीपी न्यूज एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमींग पाहा इथे
2015 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. दिल्लीत 132 मतदार असे आहेत ज्यांचे वय 100 वर्षापेक्षा अधिक आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांनी केलेल्या कामाबाबत मत देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
News18 Lokmat चा एक्झिट पोल कुठे पहाल?
तर येत्या 11 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीचे अंतिम निकाल जाहीर केले जाणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक पक्षाने विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी जोरदार तयारी केल्याचे सुद्धा दिसून आले होते. त्यामुळे यंदा कोणाचे सरकार येणार किंवा कोणाला बहुमत मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.