Delhi Weather News: राजधानी दिल्लीमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच, दाट धुकेही पसरल्याने दृश्यमानता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. खास करुन दिल्ली आंतरराष्ट्रीय विमातळावरी दृश्यमानता शून्यावर आल्याने विमानोड्डाणास अडथळा (Delhi Airport Flight Delays) निर्माण झाला आहे. त्यामुळे विमानतळाने एक सल्लापत्र (Delhi Airport Issues Advisory) जारी केले आहे. ज्यामध्ये विमानतळाने प्रवाशांना उड्डाणाच्या माहितीसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) तापमानात 9.4 अंश सेल्सिअसची घट नोंदवली, तर धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात विमानोड्डाणात व्यत्यय निर्माण झाला. ताज्या आकडेवारीनुसार, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) च्या विविध भागांमध्ये दृश्यमानता 125 मीटर इतकी कमी होती.
'नागरिकांनी शोकोट्या पेटवल्या'
राजधानीच्या शहरामध्ये थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी शोकोट्या पेटवल्या आहेत. खास करुन, एम्स जवळील लोधी रोड, मुनिरका, आरके पुरम आणि रिंग रोड सारख्या प्रमुख स्थानांवरून टिपलेल्या व्हिज्युअल्समध्ये आजूबाजूला धुक्याचा एक दाट थर दिसून आला. राष्ट्रीय राजधानीतील हवेची गुणवत्ता सोमवारी 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 च्या आसपास आहे. (हेही वाचा, Maryada Purushottam Shri Ram International Airport वर 6 जानेवारीपासून देशातील महत्त्वाच्या शहरातून विमानं उडणार)
' प्रवाशांनी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधावा'
दिल्ली विमानतळाने दिलेल्या मार्गर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, “दिल्ली विमानतळावर लँडिंग आणि टेक-ऑफ सुरू असताना, CAT III चे पालन न करणाऱ्या फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी अद्ययावत उड्डाण माहितीसाठी प्रवाशांनी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधावा. CAT III इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ही धुकेविरोधी लँडिंग प्रणाली आहे जी खराब दृश्यमानतेदरम्यान सुरू करु शकते. परंतु दृश्यमानता पातळी 50 फुटांपेक्षा कमी असल्यास ती प्रमाणी सुरु करता येत नाही.
एक्स पोस्ट
Kind attention to all flyers!#Fog #FogAlert #DelhiAirport pic.twitter.com/JQZLwNfjuS
— Delhi Airport (@DelhiAirport) December 25, 2023
शून्य दृश्यमानतेसह दाट धुके
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 5:30 वाजल्यापासून दिल्ली विमानतळावर शून्य दृश्यमानतेसह खूप दाट धुके पसरले आहे. हवामान संस्थेने जोडले की राष्ट्रीय राजधानीच्या विविध भागांमध्ये दृश्यमानता 125 मीटरपर्यंत घसरली. आज IST 0530 वाजल्यापासून दिल्ली IGI विमानतळावर शून्य दृश्यमानतेसह खूप दाट धुके आहे. सर्व RWYs 125 ते 175m मध्ये RVR आणि ऑपरेशन्स CAT IIIB अंतर्गत आहेत.
एक्स पोस्ट
Fog (Visibility in m) reported at 0830 hours IST today, the 25th December over Airports
Delhi-Palam 00m
Amritsar-00m
Agra-00m
Gwalior-00m
Prayagraj-00m
Jaisalmer-00m
Delhi-Safdarjung-200m
Barapani/Shillong-300m @moesgoi @ndmaindia @DDNewslive @airnewsalerts
— India Meteorological Department (@Indiametdept) December 25, 2023
दरम्यान, बेंगळुरू ते हैदराबादला जाण्यासाठी नियोजित असलेली फ्लाइट UK897 हैदराबाद विमानतळावरील प्रतिकूल हवामानामुळे बंगलोरला परत पाठवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मुंबईहून हैदराबादकडे निघालेल्या फ्लाइट UK873 ला देखील प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला.