हरियाणासह पंजाब येथे पेंढा जाळण्यात येत असल्याने त्याचा परिणाम दिल्ली-एनसीआरवर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआर मध्ये धुक्यांचे चादर पसरल्याचे दिसून आल्याने मॉर्निंग वॉकला येण्याऱ्या काही जणांचा श्वास घेण्यास ही त्रास झाला. दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण समिती यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेल्या डेटानुसार, दिल्ली मधील आनंद विहार परिसरात AQI हा 405 वर पोहचला आहे. जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो.(पंजाब येथे शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे Western Railway च्या काही स्पेशल ट्रेन रद्द, येथे पहा संपूर्ण लिस्ट)
दिल्ली-एनसीआर मध्ये गेले 5 दिवस सातत्याने वायू प्रदुषणाचा स्तर अत्यंत वाइट होत चालल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना श्वास घेणे, घश्यात खवखव आणि डोळे चुरचुरणे अशा समस्या उद्भवत आहेत. असे सांगितले जात आहे की, पंजाब,हरियामा आणि दिल्ली जवळील परिसरात पेंढा जाळला जात असल्याचे प्रकार कमी झाले आहेत. मात्र हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी प्रदुषण निर्माण होत आहे.(Domestic Flights For Winter: हिवाळ्यासाठी DGCA कडून 55.7 टक्के विमानांच्या उड्डाणांना मंजुरी; एका आठवड्यात फक्त 12,983 उड्डाणे)
#WATCH: Pollution continues to affect the air quality in the national capital; morning visuals from India Gate. pic.twitter.com/z69IAg3pjT
— ANI (@ANI) October 26, 2020
सफर इंडियाच्या नुसार, पुढील दोन दिवस हवेची गुणवत्ता अत्यंत खराब कायम राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआर मध्ये सर्व ठिकाणी रविवारी AQI हा 300 हून अधिक असल्याची नोंद करण्यात आली. तर ग्रेटर नोएडा मध्ये एक्यूआय हा 392 वर पोहचला होता. दिल्लीतील एक्यूआय 349 नोंदवला गेला.