Mid-Day Meal (फोटो सौजन्य - X/@PCSurveysIndia)

Dead Chameleon Found In Mid-Day Meal: झारखंड (Jharkhand) मधील दुमका जिल्ह्यातील (Dumka District) टोंगरा (Tongra) येथील सरकारी माध्यमिक शाळेत (Government School) दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात (Mid-Day Meal) मृत सरडा (Dead Chameleon) सापडला. हे भोजन खाल्ल्यानंतर शाळेतील किमान 65 विद्यार्थी आजारी पडले. जेवण केल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणात एक मृत सरडा आढळला होता. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने मसालिया सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. (हेही वाचा - Mid-day Meal Food Poisoning: मध्यान्न भोजनातून विषबाधा, बिहारमधील 50 विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटीच्या त्रासामुळे रुग्णालयात)

ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडिओ) अझफर हुसनैन यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, 'विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात एक मृत सरडा आढळल्याचे सांगितले. त्यांना वैद्यकीय सेवा दिली जात असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा - Snake in Mid Day Meal: मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात आढळला 'साप'; 30 हून अधिक मुले रुग्णालयात दाखल)

टोंगरा पोलिस स्टेशनचे प्रभारी गुरुचरण मांझी यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. मध्यान्ह भोजनात सरडा कसा पडला याचा तपास सुरू आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी काम करत आहेत. या घटनेमुळे शालेय भोजन कार्यक्रमातील अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.