Cyrus Mistry | (Photo Credit - ANI/Twitte)

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख साइरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे आज (4 सप्टेंबर) अपघाती निधन (Cyrus Mistry Passes Away) झाले. या अपघातानंतर सर्वच क्षेत्रातून भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही मिस्त्री यांच्या निधनानंतर अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारयांनी सायरस मिस्त्री यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना 'आम्ही कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आम्ही गमावला', असे म्हटले आहे. तर, सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, 'सायरस मिस्त्री यांच्या रुपात आज मी एक भाऊ गमावला.'

सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक- पंतप्रधान मोदी

सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक व्यावसायीक प्रमुख होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. (हेही वाचा, Cyrus Mistry Passes Away: उद्योगपती साइरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चारोटी येथे मर्सिडीज रस्तादुभाजकाला धडकली)

ट्विट

कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आम्ही गमावला- शरद पवार

शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते एक प्रतिभावान आणि हुशार उद्योजक होते. कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आम्ही गमावला.

ट्विट

माझा भाऊ सायरस मिस्त्री यांचे निधन- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, भयंकर बातमी माझा भाऊ सायरस मिस्त्री यांचे निधन. विश्वास बसत नाही.

ट्विट

माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरवर लिहिले की, "टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या आकस्मिक आणि अकाली निधनाने धक्का बसला आहे."

ट्विट

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील चारोटी नाक्याजवळ रविवारी दुपारी झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना त्यांची कार दुभाजकाला धडकली. अपघाताच्या वेळी कारमध्ये चार जण होते. यात मिस्त्री यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.