Cyclone Yaas | (Photo Credits: Twitter/ANI)

यास चक्रीवादळ (Cyclone Yaas) आता पुढच्या काही तासांतच में पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशा (Odisha) राज्याच्या किनारपट्टीवर धडकडणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये वादळाची पूर्वसूचना देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह या राज्यांध्ये पाऊसही सुरु झाला आहे. ओडिसा जिल्ह्यातील बालासोर आणि भद्रक जिल्ह्यात प्रामुख्याने जोरदार वारा आणि पाऊस सुरु झाला आहे. तर पश्चिम बंगालमध्येही नॉर्थ 24 परगणा येथे अशिच स्थिती आहे. समुद्राचे पाणी दीघा शहरात शिरले आहे. त्यामुळे संभाव्य स्थिती विचारा घेता या दोन्ही राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाची संभाव्य परिणामकारकता विचारात घेता कोलकाता विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण स्थगित करण्यात आले आहे. कोलकाता विमानतळ प्रसानाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विमानतळ आज (26 मे) सकाळी 8.30 वाजलेपासून सायंकाळी 7.45 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार धामरा बंदर आणि बालसोर यांदरम्यान, प्रतितास 185 किलोमीटर वेगाने वारे वाहात आहे. (हेही वाचा, Cyclone Yaas Updates: 'यास' चक्रीवादळ धोकादायक वळणावर; ओडिशा, पश्चिम बंगालसह इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा, NDRF लागले कामाला)

चक्रीवादळ पारादीप आणि सागर द्वीप दरम्यान, उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकण्याची शक्याता आहे. तितास 185 किलोमीटर वेगाने वाहात असलेले वारे अत्यंत जोरदारपणे किनारपट्टीकडे कूच करत आहे. समुद्रांच्या लाटांनी किनारपट्टीला हादरे बसत आहेत. ओडिशा राज्यातून सुमारे 14 लाख आणि बंगालमधून साधारण पाच लाख नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, चक्रीवादळ यासमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोलकाता शहरात 74 ठिकाणी पंपींग स्टेशन उभारण्यात आले आहे. तर ओडिशा राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये चक्रिवादळ यास बाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा-बंगाल राज्यांमध्ये NDRF पथकं तैनात करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांच्या मुख्यमंत्री आणि पुड्डचेरी राज्याच्या उपराज्यपालांसोब चर्चा केली.

दुसऱ्या बाजूला चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलही सक्रीय झाले आहे. हवाई दलाने NDRF पथकांसोबत एअरलिफ्ट केले आहे. जे कोलकाता, भूवनेश्वर आणि पोर्ट ब्लेयर सह इतर राज्यांमध्ये आहे. तर 26 हेलिकॉप्टर्स स्टॅंड बाय मोडवर ठेवण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास हे हेलिकॉप्टर मदतीसाठी सक्रीय होईल. याशिवाय भारतीय नौदलानेही मोठी तयारी सुरु केली आहे.