Cyclone Tauktae Live Tracker Map: अरबी समुद्रात येणाऱ्या Tauktae चक्रीवादळाचा नेमका मार्ग, वेग, ठिकाण कसे पाहाल?
Cyclone (Photo Credits: Wikimedia Commons)

अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या काही दिवसांत Tauktae चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दर्शवली आहे. उत्तर अरबी समुद्रामध्ये निर्माण होणारे हे 2021 चे पहिले वादळ ठरु शकते. या चक्रीवादळाचे ऑनलाईन ट्रॅकिंग (Online Tracking) तुम्हाला करता येऊ शकते. (Cyclone Alert: दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या सुमारास पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता; मच्छिमार, बोटींना 12 मे च्या रात्रीपर्यंत परतण्याच्या सूचना)

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांना Tauktae हे नाव म्यानमार ने दिले आहे. या चक्रीवादळाचे ऑनलाईन ट्रॅकिंग तुम्ही www.cyclone.com येथून करु शकता. Tauktae Cyclone चे ट्रॅगिंक करण्यासाठी येथे क्लिक करा. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये 14 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून 16 मे पर्यंत त्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होऊ शकते.

चक्रीवादळाचे सद्य स्थान (Cyclone Tauktae Windy Tracker) -

या सोबतच लक्ष्यद्वीप, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये येत्या गुरुवारपासून 16 मे पर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जर हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला धडकल्यास महाराष्ट्रासह केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यांना 16 मे पर्यंत तडाखा बसू शकतो. या चक्रीवादळाच्या धोक्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, लक्षद्वीप येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमार आणि बोटींना परतण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, मागील वर्षी भारताने दोन मोठे चक्रीवादळ अनुभवले. बंगाल उपसागरातील Amphan आणि अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वर्षभरात कमीत कमी 5 चक्रीवादळ होण्याची शक्यता असते.