फनी वादळानंतर ओडिशात पुनर्वसन प्रकल्पाला सुरवात,पुरी येथील घरांना पुढील दोन महिन्यात सॅनिटरी नॅपकिन मिळणार मोफत
सॅनिटरी पॅड्स ( फोटो सौजन्य- फेसबुक )

Cyclone Fani Restoration Work In Odisha: मागील महिन्यात फनी वादळाच्या (Cyclone Fani) तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या ओडिशा (Odisha)  राज्यामध्ये पुनर्वसन (Restoration) प्रकल्पाला सुरवात झाली आहे. फनी वादळाचा जोर इतका जास्त होता की अनेक छोट्या शहरांमध्ये झाडे उखडून, घरांची छप्परे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, यातील कित्येक शहरांना अद्याप वीज, पाणी, नेटवर्क सारख्या सामान्य सुविधाही पुरवण्यात आलेल्या नाहीत. या पुनर्विकास काळात राज्यातील नागरिकांचे स्वास्थ्य व्यवस्थित राहावे या हेतूने पुरी येथील घरांमध्ये महिला व मुलींना पुढील दोन महिने मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वादळानंतर निर्माण झालेल्या  गंभीर परिस्थितीत महिलांच्या स्वास्थ्य, स्वच्छता व प्रतिष्ठेवर आच येऊ नये म्हणून संपूर्ण परिसर पुर्वव्रत होईपर्यंत या सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येईल असे समजतेय.  IANSने दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाच्या अमंलबजावणी साठी ओडिशा सरकार कडून 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्सची सोय करण्यात आली आहे, याशिवाय सरकारी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकृत विधानानुसार राज्यात ठिकठिकाणी मेडिकल रिलीफ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तसेच खेड्यातील पाण्याच्या स्रोतांना जंतूमुक्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.ज्यांतर्गत अतिसार व अन्य आजारांच्या जंतूंना मारून पाणी स्वच्छ करणाऱ्या हॅलोजन गोळ्या वाटण्यात येत आहेत. Cyclone Fani : फनी वादळग्रस्तांना अक्षय कुमार याचा मदतीचा हात,CM Relief Fund मध्ये जमा केली 1 कोटी रुपयांची रक्कम

दरम्यान फनी वादळाच्या कालावधीत मृत झालेल्यांची संख्या 64 वर पोहचली आहे. यातील 25 जण हे प्रत्यक्ष वादळामुळे तर 20 जण वादळात उखडलेली झाडे, विद्युत खांब यांच्याखाली चिरडून मृत्यू पावले आहेत.याव्यतिरिक्त पुरी जिल्ह्याला अय वादळाचा मोठा फटका बसल्याने 3 मे ला आलेली वादळात 39 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते,अशी माहिती माहिती व जनसंपर्क अधिकारी संजय कुमार सिंग यांनी दिली आहे.