बंगालच्या खाडीत आलेले असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) आता रौद्र रुपात बदलले आहे. या वादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम आणि तामिळनाडूच्या चेन्नई येथे अनेक विमानसेवा प्रभवीत केल्या आहेत. विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळ (Visakhapatnam International Airport) निदेशक श्रीनिवास यांनी म्हटले की, इंडिगोने खराब हवामानामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा 23 विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. त्यांनी म्हटले की, विशाखापट्टणम मध्ये खराब हवामानामुळे एअर एशियानेही चार उड्डाणे रद्द केली आहेत. चेन्नई विमानतळावरुनही हैदराबाद, विशाखापट्टण आणि जयपूर, मुंबईकडे जाणाऱ्या 10 विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे.
असानी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडीशा, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी प्रदेशातील किनारपट्टीलगतच्या भागात जोरादर पाऊस कोसळतो आहे. काही परिसरात काहीसी विश्रांती घेऊन पाऊस कोसळतो आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, चक्रीवादळामुळे तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगना या राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय आयएमडीने बुधवार ते शुक्रवार या कालावधीत असम, मेघालय आदी राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (हेही वाचा, Cyclone Asani: असानी चक्रीवादळ व्याप्ती वाढवतंय, महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये पावसाची शक्यता, तिन राज्यांना सावधानतेचा इशारा)
ट्विट
#WATCH Heavy rain in Visakhapatnam under the influence of cyclone 'Asani' over the Bay of Bengal pic.twitter.com/hmeLvElT1B
— ANI (@ANI) May 10, 2022
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम-मध्य आणि त्यालाच लागून असलेल्या दक्षिण बंगालच्या खाडीत समुद्रामध्ये वाऱ्याची जोरदार हालचाल सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने किनारपट्टीलगतचे लोक आणि मच्छिमारांना काही काळ समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. किनारपट्टीलगतच्या पर्यटण आणि पर्यटकांनाही 13 मे पर्यंत सर्व सेवा स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.