हैदराबाद: डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याच्या कारणाने फूड नाकारल्याने Swiggy कडून पोलिसात तक्रार दाखल
Swiggy | Representative Image | (Photo Credits: Swiggy @swiggy_in Twitter)

हैदराबाद येथे एका डिलीव्हरी बॉयला धर्म विचारुन त्याच्याकडून ऑर्डर केलेले फूड घेण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे स्विगी कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. तर डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याच्या कारणामुळे त्याच्याकडून फूड नाकारल्याने त्याने पोलिसात ऑर्डर केलेल्या व्यक्तीच्या विरोधात स्विगीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

डिलिव्हरी बॉयने हा मुद्दा मुस्लिम संगठनेच्या समोर सुद्धा मांडला आहे. त्यामुळे त्यांनी ट्वीटरवर या मुद्दासंबंधित पोस्ट केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, फूड ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने चिकन 65 ऑर्डर केले होते. त्याचसोबतच हिंदू डिलिव्हर बॉयकडे फूड पाठवून देणे अशी अट ठेवली. मात्र मुस्लिम तरुण फूड घेऊन आल्याने त्याने स्विकारले नाही.(ITC ने लॉन्च केलं जगातील सर्वात महागडे चॉकलेट, किंमत ऐकून धक्क व्हाल!)

 स्विगीने आम्ही फूड डिलिव्हरी करताना धर्माचा विचार करत नसल्याचे म्हटले. तसेच फूड ऑर्डर कोणत्याही व्यक्तिच्या जातीवरुन करत नाही. मात्र आता गुन्हा दाखल केल्यानंतर ज्या व्यक्तिने फूड मागवले होते त्याच्यासोबत संपर्क होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु व्यक्तीने ज्या हॉटेलमधून फूड मागवले होते ते सुद्धा एक मुस्लिम मालक चालवतो. यापूर्वी मध्य प्रदेशातील एक प्रकार समोर आला होता. त्यावेळी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयसोबत ही हाच प्रकार घडला होता.