ITC ने लॉन्च केलं जगातील सर्वात महागडे चॉकलेट, किंमत ऐकून धक्क व्हाल!
Trinity-Truffles Extraordinaire (Photo Credits-Twitter)

भारतीय कंपनी आयटीसी (ITC) यांनी जगातील सर्वात महागडे चॉकलेट नुकतेच लॉन्च करुन इतिहास रचला आहे. कंपनीने लग्जरी ब्रॅन्ड फॅबेलच्या रेंजमधील 'ट्रिनिटी ट्रफल्स एक्स्ट्राऑर्डिनेअर' (Trinity-Truffles Extraordinaire) नावाने चॉकलेट प्रदर्शित केले आहे. तर या चॉकलेटचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये दाखल झाले आहे. या चॉकलेटची किंमकत तब्बल 4.3 लाख रुपये प्रति किलो एवढी आहे.यापूर्वी हे चॉकलेट 2012 मध्ये 'चॉकोलेटियर फ्रिट्ज क्निपशिल्ड्स ली मॅडेलाइन ऑ ट्रफल' यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडला होता.

आयटीसीने लॉन्च केलेले हे चॉकलेट तीन वेरियंट मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. याच्या वेरियंटमध्ये ताहितियन व्हेनिला बीन्ससह टोस्टेड कोकोनट गॅनेश आहे. तर दुसऱ्या वेरियंटमध्ये घाना डार्क चॉकलेट आणि जमकॅन ब्लू माउंटन कॉफीचे स्वाद असणार आहे. तिसऱ्या वेरियंटमध्ये एक्सट्रीम वेस्ट स्रोत मधून मिळवलेले डॉमिनिक डार्क चॉकलेट आहे. जगातील हे सर्वात महागडे चॉकलेट लाकडाच्या बॉक्स मध्ये उपलब्ध होणार असून त्यामध्ये 15 ट्रफल असणार आहे. प्रत्येक ट्रफलचे वजन 15 ग्रॅम असणार आहे. ट्रिनिटी ट्रफल्सच्या 15 कॅन्डी असणारा बॉक्स 1 लाख रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच एका कॅन्डीची किंमत जवळजवळ 6667 रुपये असणार आहे.(मुंबई: Four Season हॉटेल मध्ये दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत 1700 रुपये, नेटकऱ्यांना आठवला राहुल बोस चा प्रसंग)

ट्रिनिटी ट्रफल्स हे चॉकलेट फ्रान्समधील प्रसिद्ध शेफ फिलिप कॉन्टिसिनी आणि फॅबेलचे मास्टर चॉकलेटियर यांनी मिळून बनवले आहे. तर ते पेस्ट्री ऑफ ड्रीम्स चे हेड पेस्ट्री शेफ आहेत. दरम्यान आयटीसीने यापूर्वी 2016 मध्ये एका लग्जरी चॉकलेट ब्रॅन्ड फॅबेली लॉन्च केले होते. हे चॉकलेट्स आयटीसीच्या लग्जरी हॉटेलमधील जुन्या बुटीक स्टोरमध्ये विकले जातात. आयटीसी एफएमजीसी, हॉटेल, अॅग्रोमध्ये सहभागी असलेल्या या दिग्गज कंपनीचे बाजार भांडवल जवळजवळ 50 अरब डॉलर आहे.