मुंबई: Four Season हॉटेल मध्ये दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत 1700 रुपये, नेटकऱ्यांना आठवला राहुल बोस चा प्रसंग
Mumbai's Four Seasons Hotel Charges Rs 1700 For 2 Boiled Eggs (Photo Credits: Pixabay, @KartikDhar Twitter)

अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) याला अवघ्या दोन केळ्यांसाठी तब्बल 442 रुपये आकारल्याचा प्रसंग अजूनही चर्चेत असताना मुंबईतील Four Season नामक एका मोठ्या हॉटेल मध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडल्याचे समजत आहे. हॉटेलमधील एका ग्राहकाच्या बिलामध्ये केवळ दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत तब्बल 1700 रुपये लागवण्यात आली. यानंतर या ग्राहकाने आपल्या बिलाचा फोटो काढून शेअर करताच नेटऱ्यांना पुन्हा एकदा राहुल बोस सोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. सोशल मीडियावर हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर होताच अनेकांनी आपल्या अकाऊंटवरून व्हायरल केला आहे. अशातच एकाने तर राहुल बोस याला सुद्धा टॅग करून आपण पुन्हा आंदोलन करायचे का अशी विचारणा केली आहे. तसेच सर्वानी सोशल मीडियावरून हॉटेलच्या अवाजवी बिलिंग पद्धतीवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे.

2 अंडी= 1700 रुपये, पहा बिल

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस याला सुद्धा चंदिगढ मधील JW Marriott मध्ये सामान अनुभव आला होता.केवळ दोन केल्यांसाठी 442 रुपये आकारलेल्या बिलाचा फोटो काढून त्यावेळी राहुल याने हा विषय सोशल मीडियावर आणला होता. त्यानंतर बडे हॉटेल्स ग्राहकांना विनाकारण लुटत असल्याचे आरोप लावले जात होते. यावेळी फेडरेशन ऑफ हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने JW Marriott ची बाजू मांडत, बिलिंग प्रक्रियेत काहीही अवैध नसल्याचे म्हंटले होते. राहुल यांच्या बिळात लावलेली अधिक रक्कम ही जीएसटीचे दर धरून होती, त्यामुळे त्यात काहीही चुकीचे नाही असे स्पष्ट केले होते.

दरम्यान, हॉटेलच्या स्टाफसह अनेकांनी या स्पष्टीकरणावर टीका केली होती. ज्यानंतर, एक्साइज व टॅक्सेशन डिपार्टमेंटच्या स्वतंत्र टीम तर्फे JW Marriott ला 25 हज़ार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.