Nischal Shetty, WazirX | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाजारात पाठिमागील 12 महिन्यांमध्ये जवळपास 600% वाढ झाली आहे. ही वाढ मूल्यात मोजायची तर 2.4 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. गुंतवणुकदारांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये सातत्याने ऋची दखवल्याने ही वाढ होू शकली असल्याचे वजीरएक्स (WazirX) चे सीईओ निश्चल शेट्टी (Nischal Shetty) यांनी म्हटले आहे. दरम्यान, क्रिप्टोकरन्सीला एक प्रकारच्या इकोसिस्टम प्रमाणे रेग्युलेट केले जाईल अशी शक्यता आहे. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल मुद्रा विधेयक 2021 ससंसदेत सादर केले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

वजीरएक्स चे सीईओ निश्चल शेट्टी यांनी आयएनएस सोबत बोलताना सांगितले की, वजीरएक्स भारतातील सर्वात मोठा क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. प्रामुख्याने देशातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर क्रिप्टो करन्सीकडे आकर्षित होतो आहे. गुंतवणुकदारांची सुरक्षा, परताव्याची जोखमी आणि सुरक्षीतता इतर गोष्टी ध्यानात घेऊन वजीरएक्स काम करते. आकडेवारी पाहिली तर क्रिप्टोधारकांची संख्या प्रतीदिन वाढते आहे. जागतिक पातळीवरही क्रिप्टोने कोरोना महामारीच्या सुरुवातीलाच वेग पकडण्यास सुरुवात केली. साधारण त्याच वेळी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बँकींग प्रतिबंध रद्द केले. ज्यामुळे भारतात क्रिप्टो प्रवेश अधिक सुखकर झाला. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून)

कोरोना महामारीने क्रिप्टो विश्वात अधिक तेजी आणली. अधिक लोकांनी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुक केली. एकट्या वजीरएक्स वर झालेल्या ट्रेंडिंग व्हॅल्यूममध्ये 18000% वाढ झाल्याचे पाहायला मिळाल्याचेही निश्चल शेट्टी यांनी सांगितले. पाठीमागील काही महिन्यांमध्ये वाढती महागाई पाहता क्रिप्टो खरेदीवर गुंतवणुकदारांचा भर राहिला आहे. बिटकॉईनच्या दुनियेत महागाई अधिक लोकप्रिय होऊ पाहात आहे. प्रामुख्याने माइक्रोस्ट्रेटी, ग्रेस्केल, स्क्वायर, पेपाल यांसारखे अॅप क्रिप्टोशी अधिक जोडले गेले आहेत. तसेच, क्रिप्टो आणि ब्लॉकचेनबाबत अधिक जागरुकता पसरविण्याकरता या अॅपनी मदत केल्याचेही शेट्टी सांगतात.