देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला असून त्याच्या बळींची संख्या ही वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. तर सीआरपीएफच्या आणखी 3 जवानांना कोरोनाची लागण झाली असून आकडा 294 वर पोहचल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 177 जणांची प्रकृती सुधारली आहे.
विविध राज्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे यासाठी पोलीस दलातील कर्मचारी, सीआरपीएफचे जवान रस्त्यावर गस्त घालून कर्तव्य बजावत आहेत.कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसून वैज्ञानिक त्यासंदर्भात अधिक संशोधन करत आहेत. दररोज नव्याने कोरोनाचा रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.(Coronavirus Update: भारतात तुमच्या राज्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या राज्यनिहाय आकडेवारी)
3 COVID19 positive cases reported in CRPF in the last 24 hours; the total number of cases is now 294 (including 177 recovered): CRPF
— ANI (@ANI) May 18, 2020
दरम्यान, भारतातही कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून 96,000 चा टप्पा गाठला आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 5242 रुग्ण आढळले असून आज एकूण संख्या 96,169 वर पोहोचली आहे. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्येत वाढ आहे. तसेच गेल्या 24 तासांत 157 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 3029 इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.