Pakistani Woman Marries Jodhpur Youth: सचिन-सीमा हैदर आणि अंजू-नसरुल्ला यांच्या सीमापार पोहोचलेल्या प्रेमकहाण्यांची (Cross-Border Love) चर्चा अद्यापही सुरुच आहे. प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि उभय देशांच्या राजकारणी, सामान्य नागरिकांमध्येही या चर्चा आहेत. असे असतानाच आता आणखी एका प्रकरणाने या चर्चेत भर घातली आहे. पाकिस्तानच्या एका महिलेने जोधपूर येथील एका तरुणाशी विवाह केल्याचे वृत्त आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या अरबाजने वधूला लग्नासाठी भारतीय व्हिसा न मिळाल्याने अक्षरशः पाकिस्तानमधील अमीनाशी लग्न केले.
अरबाज आणि अमीना यांचा विवाह बुधवारी रात्री (2 ऑगस्ट) आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा हा सोहळा सर्व विधी पूर्ण करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील काझींनी निकाह पार पाडला. तसेच दोन्ही बाजूचे कुटुंबीय आणि नातेवाईक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जोधपूरमध्ये, वराच्या नातेवाईकांना साक्ष देण्यासाठी संपूर्ण लग्न एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले होते. (हेही वाचा, Viral Video: सीमा हैदर हिच्या बॉयफ्रेंडवर बनवलेले गाणे व्हायरल)
अरबाज हा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मोहम्मद अफझलचा यांचा धाकटा मुलगा आहे. त्याने सांगितले की तो लवकरच नवविवाहित वधूच्या भारतातील प्रवेशासाठी व्हिसा मिळावा यासाठी अर्ज करतील. आमचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. नातेवाइकांच्या माध्यमातून हा विवाहसोहळा जमला आहे. सध्या दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे आम्हाला हे लग्न ऑनलाइन करावे लागले. व्हिसा मिळण्यासाठी बराच वेळ लागेल.
अरबाज याने पुढे बोलताना सांगितले की, जोडप्याने जर पाकिस्तानमध्ये लग्न केले असते तर, या लग्नाला भारतात कायदेशीर मान्यता मिळाली नसती. अधिकृत लग्नासाठी आणि भारतीय निकाहनामासह व्हिसासाठी अर्ज केल्याने, त्यांना ही प्रक्रिया सुलभ होण्याची आशा आहे. अरबाजच्या वडिलांनी देखील वधूच्या आगमनाबद्दल कुटुंब उत्सुक असल्याचे म्हटले. अफझल ऑनलाइन विवाहांना सामान्य कुटुंबांसाठी एक अनुकूल पर्याय मानतो. असे विवाह खर्च कमी करतात. खर्च कमी असला तरी ते विवाहाच्या पवित्र बंधनाशी संबंधित प्रथा पूर्ण करतात. ते पुढे म्हणाले की वधूचे कुटुंब साधे आहे आणि या लग्नाला फारसा खर्च आला नाही.