लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीस लागला पतीच्या अनैतिक संबंधांचा सुगावा; क्रेडीट कार्ड बिल ठरले साक्षीदार
Extra Marital Affairs | Image only representative purpose (Photo credit: File Image)

एका महिलेसोबत आगोदरच प्रेमसंबंध असतानाही गांधीनगर येथील एका पठ्ठ्याने भलत्याच मुलीसोबत लग्नाचा घाट घातला. विवाह झाला. हे नवदाम्पत्य विवाहाच्या तिसऱ्या दिवशी अहमदाबाद (Ahmedabad) येथे फिरायला गेले. तेथे त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. नववधूचे दुर्देव असे की, विवाह होऊनही पतीच्या मनात ती नव्हतीच. त्याच्या जीव अजूनही पहिल्या गर्लफ्रेंडमध्येच अडकला होता. धक्कादायक असे की, पतीच्या या जुन्या आणि सुरु असलेल्या प्रेमप्रकरणाबद्दल नववधूला काहीच कल्पना नव्हती. पण, पतीचे क्रेडीट कार्ड (Credit Card) बिल तिने पाहिले आणि नवऱ्याच्या कारनाम्यंचा भांडाफोड झाला.

विवाहानंतर पत्नीसोबत अहमदाबाद येथे फिरायला आलेल्या आणि हॉटेलमध्ये राहात असलेला पती अचानक बराच वेळ बाहेर गेला होता. पत्नीने काळजीने विचारले असता माझे एक ऑफिसचे काम आहे असे सांगत तो हॉटेलबाहेर पडला होता. बराच वेळ झाला तरी तो हॉटेलवर परतलाच नाही. दरम्यान, काही दिवस गेले नववधू पतीच्या क्रेडीट कार्डचे बिल तपासत होती. बिल तपासता तपासता एक वेळ अशी आली की तिला धक्काच बसला.

पत्नीला धक्का बसला कारण ती क्रेडिट कार्डचे बिल पाहताना तारीखही पाहात होती. ती ज्या तारखेचे बिल पाहात होती ते बील ते ज्या हॉटेलवर थांबले होते आणि पती बराच वेळ हॉटेलबाहेर गेला होता त्याच दिवसाचे होते. त्या संबंध दिवसात पती परिसरातील दुसऱ्याच एका हॉटेलात थांबला होता. इकडे पत्नी त्याच्या परतन्याची वाट पाहून कंटाळून गेली होती. घडला प्रकार नववधूने आपल्या भावाला सांगितला. भावाने बहिणीने दिलेला क्रेटीट कार्डचा तपशील पाहून चौकशी केली.

भावाने केलेल्या चौकशी आढळून आले की, लग्नानंतर पत्नीसोबत फिरायला गेलेला हा आपल्या बहिणीचा पती भलत्या महिलेसोबत भलत्याच हॉटेलवर थांबला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नववधूने आपल्या साररच्या मंडळींना नवऱ्याच्या कृत्याची माहिती दिली. तर, सासरच्या मंडळींनी नवऱ्याला चार बोल समजवण्याऐवजी थेट त्याचे समर्थन करत नववधूलाच समजावले. (हेही वाचा, पश्चिम बंगाल: महिलेच्या पोटातून निघाले दीड किलो सोने आणि नाणी)

दरम्यान, अनेकदा विनवण्या करुनही सुधारणा न झाल्याने पीडित नववधुने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.