पश्चिम बंगाल (West Bengal) येथील एका महिलेच्या पोटाची सर्जरी करण्यात आली तेव्हा पोटामधून चक्क दीड किलो सोने आणि नाणी काढण्यात आली आहेत. या प्रकारामुळे डॉक्टरांसह सर्वजण चक्रावले आहेत. तर महिला मानसिक स्थिर नसल्याचे ती दागिने खात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पोटात दुखत असल्याने तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला रुग्णालयात आणून तिची प्रथम पोटाची चाचणी करण्यात आली. त्यावेळी तिच्या पोटात दागिना असल्याचे दिसून आले. त्याच क्षणी महिलेचा रुग्णालयात भरती करत तिची सर्जरी करण्यात आली. सर्जरी दरम्यान महिलेच्या पोटातून 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी डॉक्टरांनी बाहेर काढली आहेत. त्याचसोबत महिलेच्या पोटातून सोन्याची चैन, कानातले, घड्याळ यांसारख्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत.(तुरुंगात Tik Tok चा व्हिडिओ शूट करणे महिला पोलिसाला पडले महागात, गमावली नोकरी Watch Video)
पीडित महिलेच्या आईने असे म्हटले आहे की, घरातील दागिने गायब होत असल्याचे समोर आले. परंतु महिलेला याबद्दल विचारले असता ती रडू लागायची. तर महिला मानसिक रुपाने स्थिर नसल्याने काही दिवसांपासून काही खाल्ल्याने वारंवार उलटी करत असे म्हटले आहे.