भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर सुरुच आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. दिवसाला कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या 45 हजार, 49 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 12,87,945 वर पोहचला आहे. तर 30 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी म्हटले आहे. तसंच देशातील कोविड-19 चा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 63.45% असून मृत्यू दर (Mortality Rate) 2.3% इतका असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरी कोरोना व्हायरसच्या अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. देशात सध्या कोरोनाचे 4,40,135 अॅक्टीव्ह रुग्ण असून 8,17,209 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. (COVID-19 रुग्णांसाठी Favipiravir औषध भारतात लाँच करण्यासाठी सिपला कंपनी पूर्णपणे तयारीत)
ANI Tweet:
India has so far reported 1.25 million cases and more than 30,000 deaths due to #COVID19. India has one of the lowest cases and deaths per million population. Our recovery rate stands at 63.45% whereas our mortality is at 2.3%: Dr Harsh Vardhan, Union Health Minister. pic.twitter.com/qO0nL4JiKT
— ANI (@ANI) July 24, 2020
कोरोना व्हायरस वर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यावर पूर्णपणे मात करणे कठीण आहे. दरम्यान अनेक सण-समारंभांवरही कोविड-19 चे सावट आहे. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी सण साजरे करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी सरकारकडून विशेष गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.