Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना बाधित नवे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अस्वस्थ असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसागणित वाढत असल्याने आपला रिकव्हरी रेट 75% इतका आहे. हा जगातील सर्वाधिक रिकव्हरी रेट (Recovery Rate) आहे. तर मृत्यू दर (Fatality Rate) अत्यंत कमी म्हणजे 1.87% इतका आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी दिली आहे. दरम्यान देशामध्ये 1500 टेस्टिंग लॅब्स असून ही मोठी कामगिरी असल्याचेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. (कोरोना व्हायरसचे संकट कधी संपणार? WHO च्या प्रमुखांनी दिले 'हे' उत्तर)

कोरोना व्हायरस संसर्गावर ठोस औषध किंवा लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत कोविड-19 चे संकट कायम राहणार आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणारी बिकट परिस्थिती हाताळण्याचा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यासाठी टेस्टींगचे प्रमाण वाढवण्यात आले असून देशात आतापर्यंत तब्बल 3,44,91,073 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती ICMR ने दिली आहे. (देशात 24 तासात नवे 69,878 कोरोना रुग्ण; एकुण 29,75,702 कोरोनाग्रस्तांपैकी अ‍ॅक्टिव्ह, डिस्चार्ज व मृत रुग्ण किती पाहा)

ANI Tweet:

आरोग्य मंत्रालयाने दिले्लया माहितीनुसार, सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 2,97,5701 वर पोहचला आहे. त्यापैकी 6,97,330 जणांवर सध्या उपचार सुरु असून 2,22,2577 रुग्णंनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर देशातील मृतांचा आकडा 55,794 इतका आहे. दरम्यान देशात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून जनजीवनाची गाडी हळूहळू रुळावर येत आहे.