Coronavirus Vaccine: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी कोरोना व्हायरस वरील लस 2021 पूर्वी उपलब्ध होईल असे म्हटले आहे. रविवारी झालेल्या एका टेलिकास्ट मध्ये हर्षवर्धन यांनी असे म्हटले आहे की, कोरोनावरील लस ही जवळजवळ 30 कोटी लोकांना जुन किंवा जुलै 2021 पर्यंत दिली जाणार आहे. जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.(Coronavirus Vaccine च्या ट्रायलमुळे निर्माण झाले साईड इफेक्ट्स; चेन्नईच्या व्यक्तीने Serum Institute कडे मागितली 5 कोटींची नुकसान भरपाई)
प्राप्त झालेल्या रिपोर्ट्स नुसार, हर्ष वर्धन यांनी म्हटले की 2021 च्या सुरुवातीलाच उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. कोरोनावरील लस उत्तम कार्यक्षमतेसह सुरक्षित असेल. त्याचसोबत कोरोनाची लस ही एकाच वेळी 135 कोटी लोकांना देणे शक्य नाही. त्यामुळे आमच्या प्लॅनिंगनुसार, जुन-जुलै पर्यंत 30 कोटी लोकांना कोरोनाची लस मिळेल असे ही हर्ष वर्धन यांनी पुढे म्हटले आहे.
कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर्स, शासकीय फ्रंटलाईन कर्मचारी, खासगी क्षेत्रातील म्हणजेच पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि ज्यांचे वय 65 वर्षाहून अधिक आहे त्यांना ती दिली जाईल असे ही हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. त्याचसोबत कोरोनाची लस कुठे ठेवली जातेय, कोणत्या तापमानला ठेवले जातेय आणि ट्रेनिंग बद्दल ट्रॅकिंग ही केले जाणार आहे. या प्रक्रियेत NGO ला सुद्धा सामील केले जाणार आहे.(COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारला 250 रुपयांना देणार- अदर पूनावाला)
आम्ही NGO सोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. देशात सुरक्षित, प्रभावी, विकसित आणि संशोधन केलेली कोरोनाची लस आपल्याकडे असणार असल्याचे ही हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी असे म्हटले होते की, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी फायझरची लसीची भारताला गरज नाही आहे. मात्र अन्य लसींची मानवी चाचणी केली असता ती सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.