जगभरात मागील काही दिवसांमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता काही कोविड 19 निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सोबतच नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) घेण्यासाठी देखील आवाहन केले जात आहे. पण दुसरा बुस्टर डोस घेण्याची सध्या परिस्थिती नसल्याचं सरकारी सूत्रांनी ANI शी बोलताना म्हटलं आहे. मंगळवार 3 जानेवारी दिवशी मागील 24 तासांत समोर आलेली कोरोना रूग्णसंख्या 134 आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Union Health Ministry) देण्यात आली आहे. तसेच दिवसाचा कोरोना रूग्णवाढीचा दर 0.09% असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
भारतात सध्या दुसर्या बुस्टर डोसची गरज नाही. पहिला बुस्टर डोस घेण्यासाठी अजूनही देशात पुरेशी जनजागृती नाही. National Technical Advisory Group on Immunisation कडूनही दुसर्या बुस्टर डोस बाबत सल्ला देण्यात आलेला नाही. देशात नागरिकांना अजूनही पहिला बुस्टर डोस घेण्यासाठी जागृत करणं यालाच प्राधान्य दिलं जात आहे. नक्की वाचा: COVID-19 Booster Dose: IRDA कडून इंश्युरंस कंपन्यांना कोविड 19 लसीचे 3 डोस घेतलेल्या ग्राहकांना पॉलिसी रुन्युएल मध्ये सूट देण्याच्या सूचना.
Indian Medical Association, डॉक्टर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये ज्यांनी 6 महिन्यांपूर्वी बुस्टर डोस घेतलेल्या सहव्याधीग्रस्त लोकांना दुसरा बुस्टर डोस द्यावा असं सूचवण्यात आलं आहे.
Union Health Ministry कडून देण्यात आलेल्या डेटा नुसार, 220.11 कोटी एकूण कोविड 19 लसी देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 95.13 कोटी दुसरा डोस आणि 22,41 कोटी बुस्टर डोस आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 45,769 कोविड 19 लसीचे डोस देण्यात आले आहेत.